हृदयद्रावक! पती - पत्नीची दगडाने ठेचून ठेचून हत्या, १ वर्षापूर्वी झालेलं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:04 PM2020-08-03T17:04:27+5:302020-08-03T17:23:40+5:30

कानपूरमधील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे दगडाने ठेचून पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कानपूरमधील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे दगडाने ठेचून पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (All Photos : Aaj Tak)

मूळचे बस्ती केरळ येथील रहिवासी रामदीन निषाद रेल्वेमध्ये पेंटिंगचे काम करतात. लोको ग्राउंडमध्ये बांधलेल्या क्वार्टरमध्ये वर्षानुवर्षे राहत होते.

मुलगा विष्णू आणि सून शालू हेही रेल्वे मैदानाच्या स्टेशनरी क्वार्टरमध्ये राहत असल्याचे रामदीन यांनी सांगितले. बाकीचे कुटुंब श्यामनगरमधील रामपुरम येथे भाड्याच्या घरात राहतात. 23 वर्षीय विष्णू पेंटिंगचे काम करत होता. एका वर्षापूर्वी 22 वर्षांच्या शालूशी त्याचे लग्न झाले होते. शालूने त्याचे दुसरे लग्न झाले होते. ती आपला पहिला पती सोडून मुनशिपुरवा बाबूपुरवा येथे आपल्या माहेरी राहत होती.

कानपूरच्या रेल्वेबाजार लोको मैदानावरून हृदयद्रावक बातमी आली आहे. जिथे पती-पत्नीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्येमागील गूढ सोडवण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावा शोधण्यास सुरूवात केली. या हृदयद्रावक दुहेरी हत्याकांडात पतीची दगडाच्या डोक्यावर दगड घालून तर पत्नीचा गळा आवळून हत्या करण्यात आली. पत्नीचे कपडे आणि घरातील वस्तू अस्तावस्त पडल्या होत्या. या खळबळजनक घटनेचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी घराचे सर्व सामान विखुरलेले पाहिले. महिलेच्या अंगावर सापडलेल्या दागिन्यांसह पती - पत्नीचे मृतदेह सापडल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. दरोडेखोर लुटण्याच्या उद्देशाने आले असते तर त्यांनी महिलेचे दागिने असे सोडले नसते.