‘तो’ मला बदनाम करतोय, UPSC देणाऱ्या युवतीचं टोकाचं पाऊल; पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये आली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:58 PM2021-06-22T21:58:10+5:302021-06-22T22:01:43+5:30

हॉटेलच्या रुममध्ये युवतीचा मृतदेह आढळल्याने बोकारो परिसरात खळबळ माजली

झारखंडच्या बोकारो सेक्टर ४ मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये २५ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. ही युवती UPSC परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती आहे. ही घटना आनंदा हॉटेलमध्ये रुम नंबर ३०३ मध्ये घडली.

याठिकाणी युवती ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीनं सुसाईड नोटही लिहिली होती. ती पोलिसांनी जप्त केली. जेव्हा हॉटेलमधील कर्मचारी रुम सर्विंससाठी त्या रुममध्ये गेला तेव्हा समोरील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.

तातडीनं या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सेक्टर ४ येथील पोलीस घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या संपूर्ण प्रकाराचा पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. माहितीनुसार, हॉटेलमध्ये मुलीच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट आढळली.

ज्यात मृत युवतीनं सत्येंद्र नावाच्या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. यात तिने म्हटलंय की, सत्येंद्रकडून वारंवार मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांनी युवतीची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुटुंबाच्या माहितीनुसार, युवती ट्यूशनच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली होती. मंगळवारी पहाटे ५ वाजता सेक्टर ९ मध्ये राहणारी ही युवती या हॉटेलमध्ये आली. वडिलांच्या एका कामानिमित्त ती इथं आली असून तिला रुम हवाय असं तिने हॉटेलमध्ये सांगितले.

युवतीचे वडील निवृत्त कर्मचारी आहेत आणि ते धनबाद येथे राहतात. त्यांच्या काही डॉक्युमेंटसच्या कामासाठी ती इथं आली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, युवतीच्या चर्चेनंतर तिच्याकडून आवश्यक कागदपत्रे तपासून तिला याठिकाणी रुम देण्यात आला.

परंतु मुलीसोबत झालेल्या चर्चेत अशी घटना घडले असं काहीही वाटलं नाही. त्यानंतर रुम सर्विस देणारा कर्मचारी तिच्या रुममध्ये गेला तेव्हा युवतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली.

सध्या पोलिसांनी युवतीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. सेक्टर ४ मधील पोलीस अधिकारी विनोद गुप्ता म्हणाले की, मृत युवतीच्या कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केला नाही. परंतु सुसाईड नोटमध्ये ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याचा शोध घेणं सुरू आहे.

टॅग्स :पोलिसPolice