शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalpana Varma : DSP कल्पना वर्मा सस्पेंड! व्यावसायिकाला 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून हडपले २.५ कोटी, लाखोंचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:13 IST

1 / 9
छत्तीसगड सरकारने दंतेवाडा जिल्ह्यात तैनात असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांना तातडीने निलंबित केलं आहे. एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आणि पदाचा गैरवापर करून गोपनीय माहिती लीक केल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
2 / 9
गृह (पोलीस) विभागाने प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर निलंबनाचे आदेश जारी केले. आदेशानुसार, तपासात आर्थिक व्यवहार, नोंदवलेले जबाब आणि व्हॉट्सएप चॅटमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे.
3 / 9
कल्पना वर्मा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवल्याचे आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे तपासात समोर आलं आहे. ही कृती 'छत्तीसगड नागरी सेवा आचरण नियम, १९६५' चं उल्लंघन असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
4 / 9
डीएसपी कल्पना वर्मा आणि रायपूरचे व्यावसायिक दीपक टंडन यांच्यातील वादाच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारच्या निर्देशानुसार, एका अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) दर्जाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी केली.
5 / 9
या चौकशीचा सुमारे १४७५ पानांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला, ज्यामध्ये कल्पना वर्मा यांच्यासंदर्भात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
6 / 9
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान डीएसपी आणि व्यावसायिक यांच्यातील व्हॉट्सएप चॅट हाती लागलं आहेत. यामध्ये पोलिसांशी संबंधित अत्यंत संवेदनशील, गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. गुप्तचर माहिती अशा प्रकारे उघड करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जात आहे.
7 / 9
व्यावसायिक दीपक टंडन यांनी आरोप केला आहे की, २०२१ पासून कल्पना वर्मा यांनी त्यांना 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून २.५ कोटी रुपये उकळले.
8 / 9
यामध्ये सुमारे २ कोटी रुपये रोख, एक आलिशान कार, १२ लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या भेटवस्तू यांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
9 / 9
डीएसपीच्या भावाच्या नावे हॉटेल उघडण्यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोपही टंडन यांनी केला आहे. तक्रार करूनही कार आणि दागिने परत मिळाले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने अखेर कल्पना वर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस