Charles Shobhraj : आधी करत होता मदत, मग घेत होता जीव; बिकिनी किलर शोभराजची थक्क करणारी कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:30 PM2021-04-07T15:30:21+5:302021-04-07T15:46:19+5:30

Charles Shobhraj : नेपाळमध्ये शिक्षा भोगत असताना २००८ मध्ये चार्ल्सने (Charles Shobhraj) त्याच्या वयाने बऱ्याच लहान निहिता बिस्वाससोबत तुरूंगातच लग्न केलं होतं. चार्ल्सवर एक हिंदी सिनेमाही आला होता. ज्यात रणदीप हुडा याने भूमिका साकारली होती.

बिकिनी किलर आणि द सर्पेंट नावाने जगभरात कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज (Charles Shobhraj) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. चार्ल्स शोभराजवर आधारित एक सीरिज तर नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहेच. सोबतच नेपाळच्या तुरूंगात बसल्या-बसल्या त्याने मीडियाला मुलाखत दिली. त्यामुळे नेपाळ प्रशासन हैराण झालंय. आपल्या चार्म आणि अंदाजामुळे चार्ल्स गुन्हे विश्वात एक मोठं नाव झालं होतं.

चार्ल्स शोभराजचा जन्म व्हिएतनामच्या सायगॉनमध्ये ६ एप्रिल १९४४ मध्ये झाला होता. त्यावेळी सायगॉन जपानच्या ताब्यात होतं. चार्ल्सच्या वडिलाने त्याला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चार्ल्सवर याचा नकारात्मक परिणाम झाला आणि त्याचं बालपण अनेक अडचणींनी भरलेलं होतं.

शोभराजची आई व्हिएतनामची होती तर त्याचे वडील भारतीय सिंधी होते. चार्ल्सच्या आई-वडिलांनी लग्न केलं नव्हतं. चार्ल्सच्या आईची भेट व्हिएतनाममध्ये तैनात फ्रान्सच्या एका आर्मी अधिकाऱ्याशी झाली होती. त्याने दोघांना स्वीकारलं आणि अशाप्रकारे चार्ल्सला फ्रान्सची नागरिकता मिळाली.

१९६३ मध्ये शोभराज पहिल्यांदा तुरूंगात गेला होता. फ्रान्समधील पोईसी तुरूंग पॅरिस शहरापासून दूर एकांतात होतं. कुख्यात कैद्यांमध्ये चार्ल्स आपला बचाव कराटे करून करत होता. शोभराज या तुरूंगात गप्प राहत होता आणि इशाऱ्याने वस्तू मागायचा.

शोभराजला अनेक भाषा येत होत्या. तो रूप बदलण्यात तरबेज होता. आपल्या चार्मिंग पर्सनॅलिटीच्या आधारे त्याने अनेक महिलांशी मैत्री केली होती. तो या महिलांसोबत मैत्री करून त्यांना ड्रग्स देऊन जीवे मारत होता. नंतर त्यांचे पैसे लंपास करत होता. असे मानले जाते की, त्याने सर्वातआधी टेरेस नोलटन नावाच्या महिलेची हत्या केली होती.

चार्ल्स तुरूंगातून बाहेर आल्यावरही गुन्हे विश्वात अॅक्टिव राहिला. त्याने अनेक घोटाळे करून पैसे जमवले होते. त्यानंतर तो यूरोप सोडून इस्तांबुल नंतर भारतात आला होता. चार्ल्सने सेंटाल नावाच्या महिलेसोबत लग्नही केलं होतं. सेंटालने भारतात चार्ल्सच्या बाळाला जन्म दिला होता.

१९७० दरम्यान चोरी केलेल्या कारची दलाली सुरू केली होती. तो श्रीमंत भारतीयांना महागड्या कार विकत होता. तो पाकिस्तान, ईराणमधून कार चोरी करत होता. भारतात बॉर्डरमार्गे शिरत होता. तो भारतात एका फ्रेन्च सोसायटीसोबत जुळला होता. त्याद्वारे तो मोठ्या लोकांमध्ये उठबस करत होता.

जुगारात सर्वकाही हरल्यानंतर त्याने दिल्लीचं अशोका हॉटेल लुटलं होतं. तो दिल्लीहून मुंबई एअरपोर्टला जात होता. पण कस्टम विभागाला त्याच्यावर संशय आला. त्याच्याकडून लुटलेला माल जप्त करण्यात आला. चार्ल्स तेथून पळून गेला. पण नंतर त्याला लगेच पकडून तिहार तुरूंगात टाकलं गेलं.

चार्ल्सच्या वडिलाने त्याची जमानत घेतली होती. त्यानंतर तो भारतातून पळून अफगाणिस्तानमध्ये गेला आणि हिप्पी लोकांमध्ये नशेचा व्यवसाय केला. काबुलमध्ये आरामदायक जीवन जगत असूनही तो तिथून पळून गेला. तो यूरोपमध्ये गेला.

१९७२-१९७६ दरम्यान त्याने २४ लोकांची हत्या केली होती. २००३ मध्ये नेपाळमध्ये गेल्यावर त्याला १९७५ मध्ये दोन हिप्पींच्या हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा झाली. १९९७ मध्ये चार्ल्स भारतातील तुरूंगातून बाहेर आला. तेव्हा त्याला फ्रान्सचा एक अभिनेता-निर्मात्याने त्याच्या जीवनावर सिनेमा आणि पुस्तकाच्या अधिकारासाठी कथितपणे ९७ कोटी रूपये घेतले होते.

नेपाळमध्ये शिक्षा भोगत असताना २००८ मध्ये चार्ल्सने त्याच्या वयाने बऱ्याच लहान निहिता बिस्वाससोबत तुरूंगातच लग्न केलं होतं. चार्ल्सवर एक हिंदी सिनेमाही आला होता. ज्यात रणदीप हुडा याने भूमिका साकारली होती.

नेपाळच्या तुरूंगात कैद असलेल्या चार्ल्स शोभराजवर भारत, थायलॅंड, नेपाळ, तुर्की आणि ईराणमध्ये हत्येचे २० पेक्षा आरोप आहेत. त्याला सीरिअल किलर म्हटलं जााऊ लागलं होतं. पण ऑगस्ट २००४ पर्यंत त्याला कोणत्याही केसमध्ये दोषी ठरवण्यात आलं नव्हतं. त्याने तुरूंगात बसून मुलाखत दिल्याने नेपाळचं गृह मंत्रालय टेंशनमध्ये आलंय.

Read in English