शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Video Call उचलला आणि स्क्रीनवर दिसली न्यूड तरुणी अन् ७६ वर्षीय वृद्धाचं आयुष्य उद्ध्वस्त!; नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 3:38 PM

1 / 9
दिल्ली सरकारच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक ७६ वर्षीय वृद्ध हसत-खेळत आपलं निवृत्ती जीवन जगत होते. कधी यमुनेच्या काठावर स्थित मुलाच्या घरी जाऊन राहायचे तर कधी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या दुसऱ्या मुलाच्या घरी जात असत. सामाजिक कामांमध्ये हिरिरीनं पुढाकार घेत असल्याचनं समाजात त्यांना चांगली प्रतिष्ठा होती.
2 / 9
पण ७ ऑगस्ट रोजी त्यांना एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. १२ ऑगस्ट रोजी सेक्सटॉर्शनबाबत बातमी छापून येताच याचे शिकार ठरलेले अनेक लोक आपली कहाणी स्वत:हून पुढे येऊन सांगू लागले आहेत.
3 / 9
त्याचं झालं असं की या ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला सेक्सटॉर्शनसाठी जो व्हिडिओ कॉल आला त्यावेळी ते आपल्या कुटुंबीयांसोबत होते. वारंवार कॉल येत होता त्यामुळे वृद्धाच्या हातून घरातील एका सदस्यानं मोबाइल हिसकावून घेतला आणि तेव्हा लक्षात आलं की वृद्ध व्यक्ती सेक्सटॉर्शनची शिकार झाली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला.
4 / 9
७ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलला तेव्हा समोर एक न्यूड तरुणी दिसली. जी अश्नील चाळे करत होती. जेव्हा एक-दिड मिनिटं हा संपूर्ण व्हिडिओ कॉल सुरू होता. त्यानंतर संबंधित तरुणीचा फोनकॉल आला आणि धमकीच्या आवाजात ५० हजार रुपयांची लाच मागण्याचा प्रकार सुरू झाला.
5 / 9
पैसे नाही दिले तर आता झालेल्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ज्यात तुम्ही मला पाहात आहात. हेच व्हिडिओ रेकॉर्डिंग मी तुमच्या मोबाइल फोनमधील सर्व कॉन्टॅट्सना पाठवून देईन. वृद्ध व्यक्ती घाबरला. त्यादिवसापासून त्यांची झोपच उडाली होती. ना ते व्यवस्थित जेवत होते ना त्यांचं कशात लक्ष लागत होतं. त्यांच्यासोबत घडलेला प्रकार देखील ते कुणालाच सांगत नव्हते.
6 / 9
10 ऑगस्ट रोजी हंस भवन, ITO येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी ते आले होते. यानंतर ओळखीच्या लोकांसह ते एका खासदाराला भेटायला जात होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वत:ला सायबर क्राइम इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार अशा नावानं त्यांना एक फोन आला. एका तरुणीनं तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही आम्हाला कुठं भेटाल? असं समोरुन सांगण्यात आलं. त्यानंतर तो वृद्ध व्यक्ती आणखी घाबरला आणि आपलं स्पष्टीकरण देऊ लागला.
7 / 9
दुसऱ्या बाजूनं कथित सायबर गुन्हे निरीक्षकानं धमक्या देण्यास सुरुवात केली. वृ्द्ध व्यक्तीनं कॉल कट केल्यावर दुसरा कॉल आला. यावेळी आणखी एका व्यक्तीने तुमच्याविरुद्धची तक्रार संपुष्टात आणण्यासाठी आणि यूट्यूबवर पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याला १७,२०० रुपये दंड भरावा लागेल, असं सांगू लागला.
8 / 9
वृद्ध व्यक्तीसोबत कारमध्ये बसलेल्या लोकांना ही बाब समजली नाही. सगळे खासदाराच्या घरी बसले होते, तेवढ्यात पुन्हा फोन आला. वृद्धानं बाहेर येऊन सांगण्यात आलेली रक्कम खात्यात जमा करून टाकली. ते घरात आले आणि तेवढ्यात पुन्हा फोन आला. कॉलरने एक व्हिडिओ डिलीट झाला पण दुसरा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी २२ हजार रुपयांची मागणी केली. पीडित वृद्ध व्यक्ती जेव्हा स्पष्टीकरण देऊ लागला तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं त्यांच्याकडून फोन हिसकावून घेतला.
9 / 9
वृद्धाची अवस्था पाहून समोरची व्यक्ती त्याला ब्लॅकमेल करत असल्याचं समजलं. त्यामुळे स्वत:ला सायबर क्राइम इन्स्पेक्टर म्हणवून घेणाऱ्या तरुणाला त्यानं खडसावलं. तुम्ही कायदा हातात घेत आहात, असं भामटा बोलू लागला. त्याचे परिणाम वाईट होतील. पण वृद्धाच्या सहकाऱ्यानं फोन करणार्‍याचा जोरदार समाचार घेतला, तेव्हा कुठं पीडित वृद्ध व्यक्तीचा नराधमांनी पिछ्छा सोडला. यानंतर सायबर हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा