By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:50 IST
1 / 9मुंबई ते गोवा आणि परत मुंबई अशा क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने छापेमारी केली. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा सापडला आहे. त्याला अटक झाली असून त्याच्यासोबत अनेक असे लोक सापडले आहेत जे बॉलीवूड घराण्यांशी थेट संबंधीत आहेत. (Aryan Shahrukh Khan arrested in Cruze Rave Party.)2 / 9हिरो, हिरोईनींची मुले, नातेवाईक यामध्ये सापडले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या मोबाईलमधून आणखी काही कनेक्शन उघड होत असल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे. दिवंगत अभिनेता सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर येत आहे. 3 / 9चौकशीवेळी केवळ बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या मुलांचीच नावे नाहीत तर त्या आधी इतर रेव्ह पार्ट्या किंवा ड्रग प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्यांची नावेही समोर आली आहेत. सुरुवातीच्या तपासात संशयाची सुई मुंबईच नाही तर गुरुग्राम आणि दिल्लीकडे वळली आहे. या क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यामागे बटाटा गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 4 / 9शाहरुख खानच्या मुलाने सकाळी दिलेल्या जबाबात आपल्याला इव्हेंटसाठी गेस्ट म्हणून बोलविण्यात आले होते. ड्रग्ज पार्टीशी आपला काही संबंध नसल्याचे त्याने म्हटले होते. परंतू थोड्याच वेळापूर्वी त्याला एनसीबीने अटक केली आहे. अन्य आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शाहरुखच्या मुलाला या पार्टीमध्ये अडकविण्यात आले की तो स्वत: अडकला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 5 / 9नार्कोटिक्सशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग पेडलिंगच्या माध्यमातून मुंबईच्या तरुणांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचविण्यासाठी बटाटा गँगची सक्रियता वाढली आहे. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार बटाटा गँगची माणसेच अशा मोठ मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करतात. 6 / 9सुत्रांनुसार या क्रूझवरदेखील बटाटा गँगनेच ड्रग्ज पुरविली होती. मुंबईचा सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा हे 70 ते 80 लोकांच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर ड्रग्ज सप्लाय करतात. 7 / 9अमर उजालाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बटाटा गँग रेव्ह पार्ट्या आयोजित करते त्यामध्ये मोठमोठ्या स्टार किड किंवा उद्योगपतींच्या मुलांना फसवून लाखो, करोडो रुपयांची डील करतात असे समोर आले आहे. 8 / 9रात्रीच्या रेडवेळी एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह अन्य काही हाय प्रोफाईल लोकांना ताब्यात घेतले आहे. या लोकांचा संबंध बॉलिवुडच्या स्टार परिवाराशी आहे. सध्या या लोकांची नावे स्पष्ट करण्यात आली आहेत. 9 / 9एनसीबीने ताब्यात घेतलेल्यांपैकी काही तरुण हे गुडगाव आणि दिल्लीमध्ये देखील रेव्ह पार्ट्या आयोजित करतात. याचबरोबर काही तरुणींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे ज्या बॉलिवूड नेटवर्कशी आधीच जोडलेल्या आहेत.