शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! गुगलचा एचआर मॅनेजर असल्याचे सांगून ५० हून अधिक मुलींवर केला शारीरिक अत्याचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 6:29 PM

1 / 10
अहमदाबाद सायबर क्राइम शाखेने एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने आतापर्यंत 50 हून अधिक मुलींची पैशांसाठी फसवणूक केली असून अनेक मुलींचे शारीरिक शोषण केले आहे.
2 / 10
पोलिसांचे म्हणणे आहे की, हा आरोपी स्वत: ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)अहमदाबादमधून पास झाल्याचे सांगत होता. त्याने मॅट्रिमोनियल साइटवर वेगवेगळ्या नावांनी आयडी तयार केली होती आणि स्वत: गुगलचा एचआर मॅनेजर असल्याचे सांगत अनेक मुलींची फसवणूक करत होता.
3 / 10
ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी असे समजले की, या आरोपीने वेगवेगळ्या नावाने स्वतःला विविध मॅट्रिमोनियल वेबसाइटवर एचआर मॅनेजर म्हणून रजिस्टर केले होते.
4 / 10
एवढेच नव्हे तर त्याने प्रत्येक वेबसाइटवर स्वत:चा पगार वर्षाला 4,000,000 असल्याचे सांगितले होते. याशिवाय, आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केल्याचा दावाही त्यांने केला होता. तसेच, बनावट डिग्री देखील ठेवली होती.
5 / 10
हा आरोपी मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे, तसेच त्यांच्याकडून पैसे घेऊन फरार होत होता. त्याने 50 हून अधिक मुलींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
6 / 10
एका तरुणीच्या तक्रारीवरून अहमदाबाद पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपीला अटक केली आहे. संदीप शंभूनाथ मिश्रा असे त्याचे खरे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने मॅट्रिमोनियल साइट्सवर विहान शर्मा, प्रितीक शर्मा, आकाश शर्मा अशा अनेक नावांनी आपली प्रोफाइल ठेवली होती.
7 / 10
आरोपी हाय प्रोफाइल मुलींच्या संपर्कात येत होता, त्यानंतर आपल्या कुटुंबातील आई, बहीण आणि वडिलांचे फोटो दाखवून त्यांच्या विश्वास संपादन करत होता.
8 / 10
पोलिसांनी त्याच्याकडून 30 हून अधिक सिमकार्ड, 4 फोन, बनावट आयडी जप्त केले आहे. या व्यक्तीने अहमदाबाद उज्जैन, ग्वालियर, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यात मुलींना आपल्या जाळ्यात ओढले आहे.
9 / 10
गेल्या वर्षी अहमदाबादमधील एक 28 वर्षीय तरुणीही या आरोपीच्या जाळ्यात अडकली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
10 / 10
याबाबत पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2020 पासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस