बाबो! ७ लाखांना विकले ४ कबुतर; तांत्रिक म्हणे... आता टळेल मुलाचा मृत्यू 

By पूनम अपराज | Published: January 21, 2021 08:46 PM2021-01-21T20:46:06+5:302021-01-21T21:05:37+5:30

Crime News : महाराष्ट्रात राहणाऱ्या एका कुटुंबाने अंधविश्वास आणि अंधश्रद्धेमुळे आपल्या कमाईचे ७ लाख रुपये गमावले. 

या कुटुंबाने चार कबुतरांची ७ लाख इतकी किंमत मोजली आहे. पुण्यातील एका तांत्रिकाने या कुटुंबाला चुना लावत लाखो रुपये लुटले. (All Photos - Aaj Tak)

या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात खडी फोडण्यास पाठवले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या कुटुंबाला आरोपी ठगाने ठगवले आहे. 

असं सांगितलं जात आहे की, पीडित कुटुंबाच्या घरात एका आजारी व्यक्तीमुळे ते खूप नाराज होते. अनेक तऱ्हेचे उपचार करून देखील आजारी मुलाला बरे वाटत नव्हते. शेवटी या कुटुंबाने तांत्रिक कुतबुद्दीन नजमला भेटण्यास गेले. 

आरोपी तांत्रिक कुतबुद्दीनने या त्रस्त कुटुंबाला सांगितले की, तुमच्या मुलावर काळी जादू केली आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. मृत्यूची भीती दाखवून तांत्रिक बाबाने या कुटुंबाला ६ लाख ८० हजार रुपयांचे कबुतर खरेदी करण्यास सांगितले. 

एका कबुतराची किंमत १ लाख ७० हजार इतकी. बाबाने कुटुंबियांना आजारी मुलगा आजारातून ठीक होण्याची आशा दाखवली आणि इतकी मोठी रक्कम लुटली. बाबाने सांगितले, कबुतर खरेदी केल्याने मुलाचा मृत्यू टळेल आणि त्याऐवजी कबुतरांचा मृत्यू होईल. अशा प्रकारे कुटुंबीयांमध्ये अंधश्रद्धा निर्माण झाली. 

बरेच दिवस लोटल्यानंतर पीडित कुटुंबातील मुलाच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. जानेवारी महिना अर्धा संपला. त्यावर तांत्रिकाला कुटुंबियांना याबाबत विचारला केली असता, त्याने टोलवाटोलवीची उत्तरे दिली. प्रत्येक वेळी वाट पहा, मुलगा ठीक होईल असं सांगू लागला. अखेर कुटुंबीयांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत माहिती दिली. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी कारवाई करत कोंढवा पोलीस ठाण्यात जादू टोणा निवारण कायद्यान्वये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कुतबुद्दीनला बुधवारी अटक केली. 

Read in English