शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 4:07 PM

1 / 8
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणामुळे, हटके स्टाईलमुळे आणि ग्रामीण बाज असल्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांची साधी राहणी आणि गावकडची बोली आजही त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते.
2 / 8
दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात.
3 / 8
दानवेंनी आज औरंगाबाद शहरातून बाईक रॅली काढली. यावेळी, स्वत: बुलेट चालवून त्यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं. तसेच, संभाजीराजे यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन केलं.
4 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा 8 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्या निमित्ताने माझ्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाची 'विकास तिर्थ बाईक रॅली' काढण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.
5 / 8
औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या विकास तिर्थ बाईक रॅली ला युवकांचा आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन केले व मोदी जींच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
6 / 8
चिखलठाणा ते मुकुंदवाडी परिसरातील या बाईक रॅलीमध्ये युवकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.
7 / 8
विशेष म्हणजे हरिभाऊ बागडे त्यांच्या बुलेटवर पाठिमागे बसल्याचं फोटोत दिसून येत आहे. डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा आणि बुलेटची सवारी करतानाचे फोटो दानवेंनी शेअर केले आहेत.
8 / 8
आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी फोटो शेअर करत कार्यक्रमाची माहिती दिली. या फोटोत दानवेंची हटके स्टाईल दिसून येते.
टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद