karan kundrraची पहिली गर्लफ्रेंड आहे कोट्यवधींची मालकीन, सौंदर्याच्या बाबतीत दुसऱ्या गर्लफ्रेंडवरही केलीये मात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:48 PM2021-10-25T12:48:47+5:302021-10-25T12:57:49+5:30

karan kundrra: कृतिका एका एपिसोडसाठी ८० हजार ते १ लाखापर्यंत मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

छोट्या पडद्यावर सध्या चांगलाच चर्चेत येत असलेला शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १५ वं पर्व सुरु असून घरातील प्रत्येक स्पर्धक चर्चेत येत आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे करण कुंद्रा.

डॅशिंग पर्सनालिटी आणि स्मार्टनेसमुळे करण सध्या चांगलाच चर्चेत आहे. इतकंच नाही तर तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे.

'बिग बॉस'च्या घरात टास्क खेळण्यासोबतच करण त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. यात त्याच्या गर्लफ्रेंडची विशेष चर्चा रंगत आहे.

करण कुंद्रा,अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) डेट करत असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, तिच्यापूर्वी तो छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत होता.

'चंद्रकांता' या मालिकेत झळकलेल्या कृतिका कामरा (Kritika Kamra) हिला करण डेट करत होता. कृतिका ही करणची पहिली गर्लफ्रेंड होती.

२०१४ मध्ये 'झलक दिखला जा' या कार्यक्रमामधून कृतिका प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे त्या काळी कृतिका आणि करण यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आली होती.

कृतिका आणि करणचा ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, अजुनही त्यांच्या चर्चा कायम रंगतात. म्हणूनच कृतिकाची जीवनशैली नेमकी कशी आहे हे जाणून घेऊयात.

कृतिका ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री असून ती जवळपास २.१ मिलियन डॉलर इतक्या संपत्तीची मालकीन आहे. म्हणजेच तिच्याकडे १५ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.

कृतिका एका एपिसोडसाठी ८० हजार ते १ लाखापर्यंत मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

मालिका, जाहिराती, पेड प्रमोशन यांच्या माध्यमातून कृतिका पैसे कमावते. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षाकाठी कृतिका १. ५ कोटी रुपये कमावते.

कृतिकाला लग्झरी गाड्यांची विशेष आवड असून तिच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीजपासून मारुती सुझूकी अशा अनेक ब्रँडचा समावेश आहे.

१९८८ मध्ये बरेली येथे जन्म झालेल्या कृतिकाने नवी दिल्लीतील एका शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. आज ती लोकप्रिय अभिनेत्री असून तिने 'कितनी मोहब्बत है', 'प्यार का बंधन' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Read in English