सुयश टिळकच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:41 PM2021-10-21T15:41:32+5:302021-10-21T15:49:20+5:30

Suyash tilak: लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आयुषी भावेसोबत सुयशने साताजन्माची गाठ बांधली आहे.

'का रे दुरावा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आयुषी भावेसोबत सुयशने साताजन्माची गाठ बांधली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते सुयश आणि आयुषीच्या लग्नाची वाट पाहत होते. या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. त्यातच त्यांच्या लग्नाचा अल्बम समोर आला आहे.

सुयश आणि आयुषी या दोघांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली.

या लग्नसोहळ्यात सुयशने शेरवानी परिधान केली होती. तर, आयुषीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती.

अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

लग्नगाठ बांधल्यानंतर मिस्टर अॅण्ड मिसेस टिळक यांचा सुंदर फोटो

सुयश- आयुषीच्या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

'का रे दुरावा' ही मालिका लोकप्रिय झाल्यानंतर सुयश 'बापमाणूस', 'दुर्वा' या मालिकांमध्येही झळकला होता. उत्तम अभिनयकौशल्य आणि शांत स्वभाव यामुळे सुयश आज लोकप्रिय अभिनेता आहे.

आयुषी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती.