'पहिल्याच भेटीत केली शरीरसुखाची मागणी'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 10:15 AM2021-11-05T10:15:56+5:302021-11-05T10:20:43+5:30

Aradhana Sharma: बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी आराधना यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आराधनाने एका मुलाखतीत तिच्या प्रियकरावर काही गंभीर आरोप केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या कथानकासोबतच यातील कलाकारांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आज या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे भासतो.

अंजली भाभी, दयाबेन, माधवी भाभी, बबिता यांच्यासोबतच सध्या या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री चर्चेत येत आहे.

अलिकडेच या मालिकेत अभिनेत्री आराधना शर्मा हिची एण्ट्री झाली. या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.

आराधना कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी आराधना यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आराधनाने एका मुलाखतीत तिच्या प्रियकरावर काही गंभीर आरोप केले आहेत.

'माझ्या प्रियकराने पहिल्याच भेटीत माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती', असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

"ज्यावेळी मी पहिल्यांदाचा माझ्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेले त्यावेळी त्याने थेट माझ्याकडे सेक्सची मागणी केली. त्याची ही मागणी मला प्रचंड विचित्र वाटली. परंतु, हे संबंध ठेवण्यास त्याने मला भाग पाडलं. इतकंच नाही तर मी या सगळ्याला नकार दिल्यावर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला", असं आराधना म्हणाली.

आराधना जवळपास दीड वर्ष तिच्या प्रियकरासोबत रिलेशनशीपमध्ये होती, असंही तिने सांगितलं.

आराधना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तारक मेहतापूर्वी ती 'स्प्लिट्सविला 12' मध्येही सहभागी झाली होती. तसंच बूगी वुगी,डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे.

Read in English