Tata Power मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३ लाखांपर्यंत पगार; फ्रेशर्सही करु शकतात अर्ज, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:04 PM2021-11-16T17:04:21+5:302021-11-16T17:09:44+5:30

TATA Power कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना संकटानंतर आता बहुतांश क्षेत्रे हळूहळू सावरताना दिसत असून, अनेकविध कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यातच आता TATA च्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे.

देशातील ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी Tata Power या कंपनीत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.

Tata Power मध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बीई, बीटेक किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. ग्रॅच्युएट इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायझर या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल.

Tata Power आणि टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. बीई, बीटेक आणि डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी, फ्रेशर्स यासाठी अर्ज करू शकतात.

या पदांसाठी भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची देशातील कोणत्याही भागात नियुक्ती केली जाऊ शकते. या पदांवरील उमेदवाराला २.८ ते ३.२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. अर्जाची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी, खाजगी क्षेत्रातील एकात्मिक कंपनी Tata Power कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा टाटा पॉवरने पार केल्याचे सांगितले जात आहे.

Tata Power देशभरात १००० सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आउटलेट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाटा पॉवरच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अखंडित ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे.

Tata Power टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. टाटा पॉवरचे पहिले चार्जर्स मुंबईमध्ये इन्स्टॉल केले गेले होते.

Tata Power आता देशभरात जवळपास १८० शहरांमध्ये आणि अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्समध्ये आणि विविध बाजारपेठ विभागांमध्ये टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. Tata Power कंपनीने EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (ईव्हीसीआय) विकसित करण्यासाठी आयओसीएल, एचपीसीएल, आयजीएल, एमजीएल, विविध राज्य सरकारे यांना देखील सक्रिय सहयोग प्रदान करते.

Tata Power ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय अनेक राज्य परिवहन मंडळांसोबत भागीदारी करण्यात आली आहे, त्यामार्फत ई-बस चार्जिंगच्या सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.

Tata Power ही ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा प्रदान करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी आणि देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्यांचा उपयोग केला जाण्याला प्रोत्साहन देण्यामध्ये आमच्या अभिनव व सहयोगात्मक दृष्टिकोनाने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आहे, असे सीईओ आणि एमडी डॉ. सिन्हा यांनी म्हटले आहे.