Railway Bharti 2022: रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:11 PM2022-01-13T15:11:53+5:302022-01-13T15:20:55+5:30

Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जाणून घेऊयात रेल्वेत नोकर भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया...

Railway Gateman Vacancy 2022: भारतीय रेल्वेत इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. पूर्वोत्तर रेल्वे (North Earth Railway) विभागात गेटमन पदावर मोठी भरती निघाली आहे. रेल्वे भरती सेल म्हणजेच आरआरसीकडून (RRC) भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

उत्तर पूर्व रेल्वेत फाटकांवर गेटमनच्या पदांसाठी भरती केली जात आहे. यासाठीचं जॉब नोटिफिकेशन ११ जानेवारी २०२२ रोजी जारी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देखील घेतली जाणार नाहीय. अर्ज करण्यासाठी फक्त १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

रेल्वेच्या या सरकारी नोकरीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत देखील घेतली जाणार नाहीय. मग निवड प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार? पगार किती असणार? आणि अर्ज कसा करायचा याची माहिती पुढील प्रमाणे...

रेल्वेकडून संबंधित भरती प्रक्रिया लखनऊ मंडळ आणइ इज्जतनंगर मंडळासाठी केली जात आहे. लखनऊ मंडळच्या गेटमनच्या पदावर १८८ जागा आणि इज्जतनगरमध्ये १३५ जागांवर भरती केली जाणार आहे. एकूण ३२३ जागांसाठी गेटमन पदांसाठी भरती केली जाणार आहे.

रेल्वेकडून संबंधित भरती प्रक्रिया लखनऊ मंडळ आणइ इज्जतनंगर मंडळासाठी केली जात आहे. लखनऊ मंडळच्या गेटमनच्या पदावर १८८ जागा आणि इज्जतनगरमध्ये १३५ जागांवर भरती केली जाणार आहे. एकूण ३२३ जागांसाठी गेटमन पदांसाठी भरती केली जाणार आहे.

रेल्वेत गेटमन वॅकेन्सी २०२२ साठी पूर्वोत्तर रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्जासाठी कोणतही शुल्क भरावं लागणार नाही. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनंच स्वीकारले जातील.

आरआरसीनं दिलेल्या सल्ल्यानुसार फक्त ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून घ्यावी. अर्जाची प्रत तुम्हाला पुढे कामी येऊ शकते. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून इयत्ता १० वीपर्यंतचं शिक्षण उत्तीर्ण केलेला उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. वयाच्या ६५ वर्षांपर्यंतचे कोणतेही उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना १ जुलै २०२२ पर्यंत केली जाईल.

गेटमनसाठी ग्रेड पे १८०० (लेव्हल १) वेतनाच्या समतुल्य मानधन दिलं जाईल. सध्याचा दर हा जवळपास २५ हजार रुपये दरमहाल असा आहे. लक्षात असू द्या ही भरती प्रक्रिया दाखल केलेल्या अर्जांच्याच आधारे केली जाणार आहे.

योग्य उमेदवारांची निवड त्याच्या सैन्य सेवेच्या कालावधीच्या आधारावर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला रेल्वे हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. यात ए-३ चिकित्सा श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.