By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:40 IST
1 / 8अनेकांची गावाकडची घरं निसर्गाच्या कुशीत, डोंगर-दऱ्यांच्या सानिध्यात आहेत. पण पोटापाण्यासाठी आणि रोजगारासाठी ही माणसं गाव सोडून शहरात स्थायिक झाली आहेत. वर्षानुवर्षे ही घरं बंद आहेत किंवा त्यांचा वापर होत नाहीये.2 / 8पण आता काळजी करू नका! तुमचं तेच जुनं घर तुम्हाला शहरात बसून उत्पन्नाचा एक मोठा मार्ग मिळवून देऊ शकतं. सरकारच्या 'होमस्टे' आणि 'बेड अँड ब्रेकफास्ट' योजनेमुळे आता रिकाम्या पडलेल्या या घरांतूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी सरकार तुम्हाला केवळ परवानाच नाही, तर अनुदान आणि कर्जाचीही मोठी मदत करणार आहे. त्यामुळे आता गावच्या वाड्याला पुन्हा घरपण येईल आणि खिशातही पैसा खेळू लागेल.3 / 8शहरं सोडून गावाला आलेले पर्यटक आता मोठं हॉटेल नाही, तर आपलं गाव गाठून घरगुती वातावरणाच्या शोधात आहेत. यामुळेच सरकारने सुरू केलेल्या होमस्टे पर्यटनाला जोर आला आहे. सरकारच्या पाठिंब्याने, गावाकडे लोकही आता आपल्या घरांना छोट्या व्यवसायात बदलून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.4 / 8पर्यटन क्षेत्र आणि होमस्टेला चालना देण्यासाठी सरकारने मोठी पावलं उचलली आहेत. सरकारच्या मते, होमस्टे पर्यटनाला गावाकडं जोरदार प्रतिसाद मिळत आहे.5 / 8या धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. होमस्टे म्हणून नोंदणी केलेल्या घरांना वीज आणि पाण्याचे बिल आता 'कमर्शिअल' दराने नाही, तर 'घरगुती' दरानेच भरावे लागेल. याव्यतिरिक्त, होमस्टे चालकांना 'प्रधानमंत्री मोफत वीज योजने' अंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान मिळेल. विशेष म्हणजे, त्यांच्या कर्मचाऱ्यांना पर्यटन विभागाकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जाईल. इतकंच नाही, तर व्यवसायासाठी 'मुद्रा कर्ज योजने' अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकेल.6 / 8सरकारच्या या योजनेचा लाभ शहरातल्या, डोंगराळ भागातल्या किंवा अगदी दुर्गम ग्रामीण भागातल्या घरमालकांनाही घेता येणार आहे. जर तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल, तर घरातील काही मोजक्या खोल्यांची 'होमस्टे' म्हणून नोंदणी करू शकता.7 / 8समजा, तुम्ही त्या घरात स्वतः राहत नसाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. अशा वेळी तुम्ही 'बेड अँड ब्रेकफास्ट' या प्रकाराखाली घराची नोंदणी करून पर्यटकांना राहण्याची सोय करून देऊ शकता. फक्त एकच अट आहे, त्या ठिकाणी घराची निगा राखण्यासाठी एक 'केअरटेकर' असणे गरजेचे आहे.8 / 8जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही पर्यटन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता. या 'होमस्टे' धोरणामुळे आता साध्या माणसालाही घरी बसून एक सन्मानाचा आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी चालून आली आहे. यामुळे केवळ घरमालकांचंच नाही, तर गावातल्या रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.