मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:14 IST2025-11-23T09:11:21+5:302025-11-23T09:14:57+5:30

तुम्ही मेहनती आहात. सातत्याने काम करता. डेडलाइन्स पाळता. रिझल्टही देता. तरीही तुमची योग्य तेवढी दखल घेतली जात नाही, संधी मिळत नाही... करिअर स्लो झालेय... असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही या पाच ट्रॅपमध्ये अडकलात का? या विचार करा...

कम्फर्ट झोन - आपण ज्या गोष्टी चांगल्या करतो, त्या करणे सोपे असते. काम चुकत नाही, कौतुक मिळते आणि सुरक्षित वाटते. म्हणून आपण तेच करत राहतो. हा कम्फर्ट झोन असतो. उपाय : जे प्रोजेक्ट्स करताना तुम्हाला थोडे घाबरायला होते, त्यांच्यासाठीही हो म्हणा. भीती बाजूला सारून पुढे जा.

सर्वांना ‘हो’ म्हणणे : सगळ्यांना मदत करावी, सगळ्यांना खुश ठेवावे, कुणाला नाही म्हणू नये, ही भावना चांगली असते. पण सतत ‘हो’ म्हणणेही करिअरसाठी धोक्याचे ठरू शकते. उपाय : नम्रतेने सांगा... हे काम करायला मला आवडेल, पण ते नीट करावे, असे वाटते. त्यासाठी वेळ द्यावा लागेल.

परफेक्शनिझम : परफेक्ट करण्याच्या नादात आपण सुरुवातच उशिरा करतो आणि करिअरमध्ये उशीर करतो. आलेल्या संधीही आपण गमावून बसतो. उपाय : ८०% तयार असला तरी कामाला सुरुवात करा. २०% सुधारणा पुढे करता येतात.

शांतपणे काम : मी चांगलं काम करतो, आपोआप दिसेल. हे वास्तवात कधीच काम करत नाही. काम महत्त्वाचे आहेच, पण काम दिसणे त्याहून महत्त्वाचे आहे. उपाय : तुमच्या लहान मोठ्या यशांची लिस्ट ठेवा. योग्य वेळी मिटिंग्जमध्ये, ई-मेलमध्ये, रिपोर्टमध्ये ती हायलाइट करा.

नेटवर्किंग टाळणे : कष्ट, कौशल्य इतकेच पुरेसे असते, असे आपल्याला वाटते. लोक जोडण्यासाठी वेळ देण्यापेक्षा आपण कायम कामाला अधिक वेळ देतो. नेटवर्किंग टाळतो. उपाय : आठवड्यातून एक नवीन माणूस जोडा. सीनियर, मेंटॉर किंवा इंडस्ट्रीतला कुणाशीही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा.

















