तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 20:54 IST2025-03-22T20:49:05+5:302025-03-22T20:54:48+5:30
Benefits of Filing ITR: उत्पन्नच इतकं नाहीये की, कर लागेल? मग इन्कम टॅक्स रिटर्न कशाला भरायचा, असा विचार तुम्हीही करत असाल, तर आधी हे वाचा...

आयकर परतावा अर्थात आयटीआर दाखल करणे हे महत्त्वाचे असते. तुमचे उत्पन्न आयकर मर्यादेपेक्षा कमी असले तरी आयटीआर दाखल करावे.
आयटीआरचा वापर कर्ज, गुंतवणूक किंवा व्हिसा, आदींसाठी होतो. अनेकांच्या उत्पन्नातून टीडीएसची कपात केली जाते.
हे टीडीएसचे पैसे आयटीआर दाखल करून तुम्हाला परत मिळविता येतात. आयटीआर दाखल केलेला नसेल तर हे पैसे मिळविण्यात अडचणी येतात.
शेअर बाजारात पैसे बुडणे, व्यवसाय किंवा मालमत्तेत नुकसान आदी प्रकारे झालेले नुकसान आयटीआर दाखल करून कमी करता येते.
तुम्ही या वर्षाचे नुकसान दाखवून आयटीआर दाखल करा, पुढच्या वर्षाच्या नफ्यासोबत समायोजित करू शकता.
परदेशी प्रवासाची योजना आखत असाल, तर आयटीआर नक्की दाखल करा. अनेक देश व्हिसा देताना उत्पन्नाचा पुरावा मागतात. आयटीआर हा उत्पन्नाचा भक्कम पुरावा असतो.
बँकेकडून कर्ज घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागतो. तुम्ही आयटीआरचा वापर पुरावा म्हणून करू शकता. हे नसले तर कर्जासाठी अर्ज करता येत नाही. या पुराव्यामुळे तुमच्यावर विश्वास वाढतो.