Business from Home: नोकरीच कशाला करायला हवी? घरबसल्या हे 5 व्यवसाय सुरु करा, बक्कळ कमवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 03:34 PM2021-09-16T15:34:22+5:302021-09-16T15:47:46+5:30

you should start business from home: जर तुम्ही शिकलेले असाल आणि जर तुम्हाला तुमच्या पायावर उभे रहायचे असेल तर असे काही छोटे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही घरातून सुरु करू शकता आणि चांगली कमाई देखील करू शकता.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले आहेत. आधीच देशात बेरोजगारी कमी नव्हती. प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत आता ज्यांच्या नोकऱ्या टिकल्यात त्यांच्या नोकऱ्यांवरही संकट येण्याची शक्यता आहे. (Extra income From Home)

जर तुम्ही शिकलेले असाल आणि जर तुम्हाला तुमच्या पायावर उभे रहायचे असेल तर असे काही छोटे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही घरातून सुरु करू शकता आणि चांगली कमाई देखील करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवसायांबाबत सांगणार आहोत. या बिझनेसमध्ये खूप पैसा गुंतविण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मेहनतीने नंतर हे व्यवसाय वाढवू शकता. तसेच दुसऱ्यांनाही रोजगार देऊ शकता. एवढेच नाही तर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात ही तुमच्या घरातून करू शकता.

जर तुम्ही शिकलेले असाल आणि गणित, इंग्रजी, सायन्स सारख्या विषयात पारंगत असाल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे क्लास (Online Coaching) सुरु करू शकता. सध्या कोरोनामुळे Online Coachingकडे पालकांचा ओढा आहे. शेजार-पाजारच्या मुलांना शिकवू शकता.

एखाद्या खास विषयावर जर तुमची मजबूत पकड असेल तर तुम्ही डिजिटली तुमचे ज्ञान इतरांना देऊ शकता. जर तुम्ही कंटेंट लिहत असाल तर त्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. अनेक कंपन्यांमध्ये पार्ट टाईम काम दिले जाते. छोटे छोटे व्हिडीओ युट्यूबवर टाकू शकता. ब्लॉग लिहू शकता. काही ब्लॉग प्लॅटफार्म रीडरच्या हिशेबाने पैसे देतात. अनेकदा गूगल एडसेंस (Google Adsense) च्या माध्यमातून जाहिराती मिळतात.

तुम्ही तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करू शकता. फ्लिपकार्ट-अमेझॉन सारख्या साईटवर तुम्ही तुमची उत्पादने विकू शकता. त्यापूर्वी तुम्हाला कोणत्या उत्पादनाची किती डिमांड आहे याची माहिती मिळवावी लागेल. तुम्ही थेट त्याच्या उत्पादकाशी संपर्क करू शकता.

खर्च आणि विक्री किंमतीच्या तुलनेनंतर तुम्हाला फायद्याचा अंदाज येईल. तुम्ही उत्पादक किंवा होलसेलरला यासाठी मनवू शकता. जेवढ्या ऑर्डर येतील त्याद्वारे तुम्हाला उत्पादनांची गरज भासेल. हा व्यवसाय तुम्ही हळू हळू वाढवू शकता. मोठ्या शहरांमध्ये तुम्ही हा व्यवसाय आरामात करू शकता.

आज सर्वच कंपन्या या कर्मचारी प्लेसमेंट सर्व्हिसमधून हायर करतात. सुरक्षा गार्ड, सफाई कर्मचारी, हेल्पर आदी टेक्निकल लोक हे अशाच प्रकारे भरले जातात. तुम्ही तुमच्या घरात प्लेसमेंट एजन्सी सुरु करू शकता. त्यानंतर तुम्ही मोठ मोठ्या कंपन्यांशी टायअप करू शकता. जास्त खर्च नसलेला हा छोटा व्यवसाय आहे.

जर तुम्ही हिंदी, इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेत अनुवाद करू शकत असाल तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता. ऑनलाईन ट्रान्सलेटर बनून तुम्ही नवे करिअर सुरु करू शकता. अनेक कंपन्या पार्टटाईम ट्रान्सलेटर ठेवतात.

याशिवाय वेबसाईट डिझायनर किंवा डेव्हलपरची मोठी मागणी आहे. यामुळे तुम्ही थोडे क्लास लावून ते शिकून मोबाईल ऐप आणि वेबसाईट बनविण्यास सुरुवात करू शकता.

Read in English