जगातील दुसरे श्रीमंत जेफ बेझोस यांच्या होणाऱ्या पत्नी लॉरेन सांचेझ कोण? लग्नावर खर्च होणार ५००० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:06 IST2024-12-23T08:52:37+5:302024-12-23T09:06:52+5:30
Amazon Jeff Bezos Marriage : प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस पुन्हा लग्न करणार आहेत. जाणून घेऊ कोण आहेत त्यांच्या होणाऱ्या पत्नी.

Amazon Jeff Bezos Marriage : प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस पुन्हा लग्न करणार आहेत. अब्जाधीश बेजोस २८ डिसेंबर रोजी ते आपल्या फियान्से लॉरेन सांचेझसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. एका रिपोर्टनुसार, या लग्नावर जवळपास ६०० मिलियन डॉलर (५०९७ कोटी रुपयांपेक्षा जास्त) खर्च होणार आहे. जाणून घेऊया लॉरेन सांचेज यांच्याबद्दल.
ब्लूमबर्ग रिअल टाइम बिलियनियर्स इंडेक्सनुसार बेझोस यांच्याकडे २४४ अब्ज डॉलर्सची संपत्ती असून गेल्या २४ तासात त्यांच्या संपत्तीत १.३९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक असून त्यांच्या संपत्तीत ६६.८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
६० वर्षीय अब्जाधीश जेफ बेजोस आपल्या फियान्से लॉरेन सांचेझसोबत विवाह करणार आहेत. गेल्या वर्षी २०२३ मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. हा विवाह सोहळा २८ डिसेंबर ला कोलोराडोच्या एस्पेन मध्ये पार पडणार आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, दोन दिवसांसाठी बुक करण्यात आलेल्या महागड्या सुशी रेस्टॉरंटव्यतिरिक्त केविन कॉस्टनरच्या रँचला या लक्झरी विवाह सोहळ्याचं ठिकाण बनवण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, या लग्नासाठी ६०० मिलियन डॉलर खर्च करण्यात येतील.
बेझोस यांच्या होणाऱ्या पत्नी लॉरेन सांचेझ ही एमी पुरस्कार विजेत्या पत्रकार आणि हेलिकॉप्टर पायलट आहेत. ५५ वर्षीय लॉरेन या सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात आणि त्या जेफ बेझोस यांच्यासोबतचे फोटो शेअरही करत असतात.
गेल्या वर्षी समुद्रात नौकेवर वीकेंड एन्जॉय करत असताना दोघांच्या एंगेजमेंटची घोषणा करण्यात आली होती. अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन सांचेझ यांचा सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. त्यांच्या फोटोंवर हजारो लाईक्स येतात. अनेक प्रसारमाध्यमांसाठी अँकर म्हणून काम करून त्या चर्चेत आल्या आहेत.
अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या होणाऱ्या पत्नी लॉरेन सांचेझ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांचं इन्स्टा अकाऊंट पाहिले तर त्यावर अॅमेझॉनचे संस्थापक बेझोस यांच्यासोबतचे त्यांचे सर्व फोटो दिसत आहेत.
जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाशी संबंधित रिपोर्ट्सनुसार, जगातील सेलिब्रिटी या हायप्रोफाइल लग्नाला उपस्थित राहू शकतात. या यादीत जगातील दिग्गज बिल गेट्स, हॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते लिओनार्डो डि कॅप्रियो आणि जॉर्डनच्या राणी रानिया यांची नावं असू शकतात.