वयाच्या तिशीत २.२५ लाख कोटींची संपत्ती; संगीत क्षेत्रातही नाव; ईशा अंबानींना मागे टाकणारी ही तरुणी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:51 IST2025-02-06T12:48:29+5:302025-02-06T12:51:43+5:30

Ananya Birla Business : उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सर्वांनाच माहिती आहे. त्या एक यशस्वी उद्योजक असून तरुण वयातच त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, आता एका तिशीतील बिझनेस वुमनने तिला मागे धोबीपछाड दिली आहे.

आपण उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांच्याबाबत बोलत आहोत. व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी ती एक उत्तम गायिका आणि संगीतकार आहे. गायनाचे जग सोडल्यानंतर तिने सौंदर्य आणि कॉस्मेटिक क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनन्या बिर्ला यांची कंपनी २०२५ पर्यंत राष्ट्रीय स्तरावर सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँडची मालिका सुरू करण्यास सज्ज आहे.

अलीकडेच नीता अंबानी यांनी ४० वर्षाखालील ४०च्या यादीत समाविष्ट असलेल्या अनन्या बिर्ला हिला यंग बिझनेसवुमन पुरस्काराने सन्मानित केले होते. वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासोबतच अनन्या तिच्या व्यवसायातही वेगाने प्रगती करत आहे. ब्युटी ब्रँड सुरू करण्यापूर्वी ती स्वतंत्र मायक्रोफिन या मायक्रोफायनान्स कंपनीच्या संस्थापक आहेत. याशिवाय, ती Mpower चीही संस्थापक आहे.

अनन्याने संगीत क्षेत्राने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचे सोशल मीडियावर कोट्यावधी फोलोअर्स आहेत. पण, वडिलांनी संगीत सोडून बिसनेस सांभाळण्याचा सल्ला दिला. पण, इथेही अनन्या यांनी अल्पावधीत मोठं यश संपादन केलंय. फोर्ब्सनुसार, कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती २१.४ अब्ज डॉलर्स आहे.

अनन्याने ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयात पदवी मिळवली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजच्या संचालकपदीही ती कार्यरत आहे.

अनन्या बिर्ला ही देशातील सर्वात श्रीमंत मुलगी म्हणून ओळखली जाते, हे अनेकांना माहिती नाही. बॉलीवूड शादी डॉट कॉमच्या माहितीनुसार वयाच्या ३०व्या वर्षी अनन्याकडे १,७७,८६४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी संपत्तीच्या बाबतीत अनन्याच्या मागे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी यांची एकूण संपत्ती ८३५ कोटी रुपये आहे. अनन्याचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे जवळपास ८ लाख फॉलोअर्स आहेत.