५०० रूपयांपर्यंत वाढला डेटा आणि कॉलिंगचा खर्च; Vodafone-Idea च्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:02 PM2021-11-25T17:02:01+5:302021-11-25T17:11:51+5:30

Airtel पाठोपाठ Vodafone Idea नं देखील प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. गुरूवारपासून यामध्ये मोठी वाढ करण्यात आली.

Airtel पाठोपाठ व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) या कंपनीनं देखील आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफान आयडियाच्या प्रीपेड प्लॅन्सच्या नव्या किंमती गुरूवारपासून लागू झाल्या आहेत. कंपनीनं आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये ५०० रूपयांपर्यंतची वाढ केली आहे.

टॅरिफ वाढवल्यानंतर युझर्सना डेटा आणि फ्री कॉलिंग असलेल्या अनलिमिटेड प्लॅन्ससोबतच अॅड ऑन पॅक्ससाठीही अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. व्होडाफोन आयडियाच्या वाढीव किंमती गुरूवारपासून तर एअरटेलच्या पॅक्सच्या वाढीव किंमती शुक्रवारपासून लागू केल्या जाणार आहेत.

व्होडाफोन आयडियाचा १.५ जीबी डेटा ऑफर करणारा प्लॅन सर्वाधिक लोकप्रिय आहे. आता या प्लॅनसाठी ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा २४९ रूपयांच्या प्लॅनसाठी आता २९९ रूपये खर्च करावे लागणार आहेत. या प्रकारे कंपनीनं आपल्या २९९ रूपयांच्या प्लॅनची किंमत वाढवून ३५९ रूपये केली आहे. हा प्लॅनदेखील २८ दिवसांच्या वैधतेसह येतो.

कंपनीनं आपला ५६ दिवसांचा प्लॅनही महाग केला आहे. ५६ दिवसांचा लोकप्रिय असलेला कंपनीच्या प्लॅनची किंमत आता ५३९ रूपये झाली आहे. यापूर्वी या प्लॅनची किंमत ४४९ रूपये इतकी होती.

५३९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय ५६ दिवसांचा येणाऱ्या ३९९ रूपयांच्या प्लॅनसाठी आता ४७९ रूपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.

८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनबाबत सांगायचं झाल्यास ६९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आता ८३९ रूपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. याशिवाय ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या ५९९ रूपयांच्या प्लॅनसाठीआता ७१९ रूपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.

याचप्रकारे कंपनीचा २३९९ रूपयांचा प्लॅनही ५०० रूपयांनी महाग झाला आहे. या प्लॅनची किंमत वाढून २८९९ रूपये इतकी झाली आहे. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची असून यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा देण्यात येत आहे. तसंच दररोज १.५ जीबी इंटरनेटही देण्यात येतंय.

एअरटेलचे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. कंपनीचा २९८ रुपयांचा प्लान, जो २८ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटासह येतो, आता तुम्हाला त्यासाठी ३५९ रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, Jio २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा ऑफर करत आहे.

त्याचप्रमाणे, ५६ दिवसांची वैधता आणि दररोज १.५ जीबी डेटा देणारा एअरटेलचा प्लॅनसाठी शुक्रवारपासून ४७९ रुपये मोजावे लागतील. जिओ आपल्या ४४४ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५८ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटा देत आहे.

एअरटेलच्या ४४९ रूपयांच्या प्लॅनसाठी आता ५४९ रूपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटा देण्यात येत आहे. जिओच्या ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो.

८४ दिवसांच्या वैधतेच्या ६९८ रूपयांचा प्लॅन आता ८३९ रूपयांना मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज २ जीबी डेटा ऑफर करत आहे. तर ५९८ रूपयांच्या प्लॅनसाठी आता ७१९ रूपये मोजावे लागतील. यामध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.

Read in English