Vodafone Idea ला दूरसंचार विभागाची नोटीस; महाराष्ट्र, गुजरातसह ७ सर्कलची लायसन्स फी न भरल्याचं सांगत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:43 PM2021-04-11T15:43:18+5:302021-04-11T15:46:37+5:30

दूरसंचार विभागाने व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (VIL) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दूरसंचार विभागाने व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (VIL) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दूरसंचार विभागानं ही नोटीस आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाही जानेवारी-मार्च २०२१ मध्ये लायसन्स फी न भरल्यानं दिली आहे.

दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडियाने बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश (पूर्व) यासह काही सर्कल्समध्ये लायसन्स फी भरलेली नसल्याचं सांगण्यात आलंय.

७ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसनुसार, दूरसंचार कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची २५ मार्चपर्यंत लायसन्स फी भरली नाही.

बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व), ओडिशा आणि नॅशनल लाँग डिस्टन्स सर्कल्सशी जोडलेली ही फी आहे.

दरम्यान, व्होडाफोन आयडियानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं मार्च २०२१ च्या तिमाहीची लायसन्स फी आणि स्पेक्ट्रम युसेज चार्ज हा मार्च २०२१ मध्ये भरल्याचं सांगण्यात आलं आहे.

परंतु कोणतीही पेमेंट गॅप असेल तर ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान, दूरसंचार विभागानं पाठवलेल्या नोटीसीत त्यांना १२ एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं असून त्यांच्यावर का कारवाई करू नये अशी विचारणा केली आहे.

दूरसंचार विभागानं ही कारवाई करत लायसन्स अॅग्रीमेंटच्या तरतुदींअंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लायसन्स फी ही आर्थिक वर्षात चार टप्प्यांत दिली जाते.

कोणत्याही आर्थिक वर्षाच्या सुरूवाीच्या तीन तिमाहीत तिमाही पूर्ण होण्याच्या १५ दिवसांच्या आत हे शुल्क भरावं लागलंत. तर अंतिम तिमाहीत लायसन्स फीची रक्कम २५ मार्चपर्यंत जमा करावी लागते.