शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भंगारात निघालेल्या गाडीमुळेही होणार मोठा फायदा, नव्या वाहनावर मिळणार भक्कम सूट; समजून घ्या प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 2:34 PM

1 / 7
जुनी वाहने रस्त्यावरून हटविण्यासाठी केंद्र सरकारने स्क्रॅप धोरण आणले आहे. गाडी भंगारात काढावी लागणार असल्याने अनेकांचा तणाव वाढला आहे. गाडी भंगारातच गेल्याने आपले आर्थिक नुकसान हाेईल, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण आहे. मात्र, तसे नाही. सरकारच्या धाेरणाचे दाेन प्रमुख फायदे हाेणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
2 / 7
जुनी गाडी भंगारात काढल्यास नव्या गाडीवर ५ टक्के सूट मिळेल. नव्या गाडीची आरटीओमध्ये नाेंदणी करण्यासाठी शुल्क लागणार नाही. दिल्लीमध्ये एखादी डिझेल गाडी १० वर्षांनी भंगारात काढावीच लागणार आहे.
3 / 7
स्क्रॅप केल्यानंतर १० लाखांची नवी गाडी खरेदी केल्यास एक्स-शाेरूम किमतीवर ५० हजारांची सूट मिळेल. तसेच १ लाखाचा नोंदणी खर्चही वाचेल.
4 / 7
गाडी स्कॅप केंद्रावर नेण्यापूर्वी काय करावे? - गाडी स्कॅप केंद्रावर नेण्यापूर्वी वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), वीमा, फिटनेस प्रमाणपत्र ही गाडीशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत न्यावी लागतील. साेबतच स्वत:चा वाहन चालविण्याचा परवाना आणि ओळखपत्र न्यावे लागेल. त्यानंतर गाडी जमा केल्याची प्रक्रिया करण्यात येईल.
5 / 7
फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक - १० वर्षे जुनी डिझेल आणि १५ वर्षे जुनी पेट्राेलची वाहने फिटनेस चाचणीत फेल झाल्यास भंगारात काढावी लागतील. फिटनेस चाचणीत फेल झाल्यास तसे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
6 / 7
या चाचणीत गाडी फेल झाल्यानंतर जवळच्या स्क्रॅप सुविधा केंद्रात गाडी जमा करावी लागेल. सर्व माेठ्या शहरांमध्ये अशी केंद्रे सुरू हाेणार आहेत.
7 / 7
डिस्ट्रक्शन प्रमाणपत्र आरटीओमध्ये द्या! गाडी स्क्रॅप झाल्यानंतर वाहन नष्ट केल्याचे प्रमाणपत्रही मिळेल. ते आरटीओमध्ये जमा करावे लागेल. त्यानंतर गाडीला डिलिस्ट करण्यात येईल. भविष्यात हा नोंदणी क्रमांक काेणीही वापरू शकणार नाही.