'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या जोडीदाराला द्या अनोखी भेट; आयुष्यभर फक्त तुमच्याच नावाचा जप करेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:18 IST2025-02-14T16:07:23+5:302025-02-14T16:18:38+5:30

Valentines day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, तुमच्या जोडीदाराला चॉकलेट किंवा फुलांचा पुष्पगुच्छ गिफ्ट करण्याऐवजी तुम्ही अनोखं गिफ्ट देऊ शकता. यामुळे आपल्या जोडीदाराचं भविष्य सुरक्षित होईल.

सोन्याचे दागिने भेट देण्याऐवजी तुम्ही सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करू शकता. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या जोडीदाराला डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बाँड भेट देऊ शकता.

तुमच्या गुंतवणुकीत आणखी वैविध्य आणण्यासाठी, तुम्ही InvITs द्वारे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू शकता. InvITs मध्ये, रस्ते, महामार्ग आणि पूल, पॉवर प्लांट यांसारख्या पायाभूत सुविधांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित केला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) हे म्युच्युअल फंडासारखे असतात. ज्याद्वारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून परताव्याच्या रूपात चांगला नफा मिळवता येतो.

REITs रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी देतात. यामध्ये, REIT शी संबंधित कंपनी छोट्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि मोठ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवते. यामध्ये, सर्व गुंतवणूकदारांना सहभागी मानले जाते आणि त्यांना रिअल इस्टेटमध्ये शेअर्स मिळतात. यामध्ये गुंतवणूकदारांना लाभांश किंवा शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीतून नफा मिळतो. REITs च्या माध्यमातून तुम्ही मोठ्या इमारती, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, ऑफिस स्पेस, सेल टॉवर्स, डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करू शकता.

तुमच्या जोडीदाराला भविष्यात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता हा चांगला पर्याय आहे. अशा मालमत्तांचे मूल्य वेळेनुसार वाढत जाते.

तुम्ही जोडीदाराच्या नावाने शेअर मार्केटमध्येही पैसे गुंतवू शकता. तिथे जोखीम वाटत असेल तर एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.