State Bank : घरबसल्या बदला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; पाहा संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 07:49 PM2021-05-14T19:49:03+5:302021-05-14T19:58:11+5:30

State Bank Of India : स्टेट बँकेच्या खातेधारकांना रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

कोरोनाच्या दुसरी लाट ही अधिक धोकादायक दिसत आहे. त्यामुळे अनेक जण सध्या घरातूनच काम करणं पसंत करत आहेत.

सध्याच्या युगात बँकिंगसंबंधित कामेही घरीच बसून पार पाडली जात आहेत. परंतु काहीवेळा असं होते की मोबाइल नंबर बदलल्यामुळे किंवा इतर काही कारणास्तव जर बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्याची गरज आपल्याला भासते. त्यामुळे आपल्याला बँकेतही जावं लागू शकतं.

सद्य परिस्थिती पाहता एसबीआयने आपल्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. आता एसबीआय खातेदार बँकेत न जाता घरबसल्या त्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबर बदलू शकतात.

याशिवाय जवळच्या एटीएममधूनही ग्राहकांना मोबाईल क्रमांक बदलण्याची संधी देण्यात आली आहे. जाणून घेऊया कसा बदलू शकाल तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक.

सर्वप्रथम आपल्या एसबीआय खात्यात लॉग इन करा. त्यानंतर प्रोफाईल टॅबमध्ये जाऊन डिटेल्स क्लिक करा.

त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका. त्यानंतर त्या ठिकाणी नाव, ईमेल, आणि इंडटरनेट बँकिंगमध्ये रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक डिस्प्ले होईल.

त्यानंतर ‘Change Mobile Number-Domestic only (Through OTP/ATM/Contact Centre) वर क्लिक करा.

नवी स्क्रिन ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन टॅब दिसतील. क्रिएट रिक्वेस्ट, कॅन्सल रिक्वेस्ट आणि स्टेटस.

नवा मोबाईल नंबर त्या ठिकाणी भरून सबमिट क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी नवं पॉपअप येईल आणि त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी विचारलं जाईल. त्यावेळी ओके करा.

त्यानंतर मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तीन पर्यांयांच्या माध्यमातून तुम्हाला पडताळणी करावी लागेल. पहिला म्हणजे दोन्ही मोबाईल क्रमांकावर ओटीपी, दुसरा म्हणजे एटीएमद्वारे इंटरनेट बँकिंग रिक्वेस्ट अप्रुव्हल आणि तिसरा म्हणजे कॉन्टॅक्ट सेंटरद्वारे अप्रुव्हल.

जर तुम्ही By OTP on both the Mobile Number चा पर्याय स्वीकारला तर तुमच्याकडे नवा आणि जुना दोन्ही क्रमांक असणं आवश्यक आहे.

त्यानंतर ज्या खात्याचं डेबिट कार्ड आहे ते खातं निवडा. त्यानंतर एटीएम कार्ड व्हॅलिडेशन स्क्रिन वर पेज रिडायरेक्ट होईल आणि त्या ठिकाणी तुमच्या एटीएम कार्डाशी निगडीत माहिती दिसेल.

त्यानंतर सुरू असलेलं एटीएम कार्ड निवडा आणि कन्फर्म करा. पुढील स्क्रिनवर तुम्हाला एटीएम कार्ड क्रमांक दिसेल.

पिन क्रमांकासह सर्व माहिती भरून प्रोसिडवर क्लिक करा. प्रोसेस यशस्वी झाल्यास तुमच्या दोन्ही क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर दोन्ही क्रमांकांवरून चार तासाच्या आत ACTIVATE <ओटीपी> <१३ अंकी रेफरन्स नंबर> टाकून 567676 वर पाठवून द्या.

ओटीपी आणि रेफरन्स क्रमांक व्हॅलिडेट ढाल्यानंतर नवा मोबाईल क्रमांक अॅक्टिव्हेट होईल आणि त्यासंदर्भातील एसएमएसही तुम्हाला मिळेल.

जर तुम्ही एटीएम म्हणजेच IRATA : Internet Banking Request Approval through ATM वर क्लिक केलं असेल तर प्रोसिड करा.

ज्या अकाऊंटचं तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे ते सिलेक्ट करून प्रोसेस करा. त्यानंतर तुमचा स्क्रिन रिडायरेक्ट होईल.

त्या ठिकाणी तुमचा अॅक्टिव्हेट असलेला कार्ड क्रमांक सिलेक्ट करा. पिनसह अन्य विचारलेली माहिती त्या ठिकाणी भरून प्रोसिड करा.

व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर होईल. परंतु अजून काही स्टेप्स तुम्हाला कराव्या लागतील. तुम्हाला एसएमसद्वारे एक रेफरन्स नंबर येईल.

त्यानंतर तुम्हाला नजीकच्या एटीएममध्ये जेऊन तुमचं कार्ड टाकून त्या ठिकाणी सर्व्हिसेस हा ऑप्शन निवडावा लागेल.

त्यानंतर Others हा टॅब सिलेक्ट करून Internet Banking Request Approval वर क्लिक करा आणि तुम्हाला आलेला १० अंकी रेफरन्स नंबर टाका.

प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मसेजही येईल.