Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदीचा दरही वाढला; जाणून घ्या, आजचा लेटेस्ट रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:40 IST2023-03-15T15:28:45+5:302023-03-15T15:40:00+5:30
Today's Gold-Silver Rate: ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.

लग्नसराईचा मुहूर्त सुरु आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,८७० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५३,०५० रुपये इतके आहे.
तर १ किलो चांदीचा दर ६९,००० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीतील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्याने आजही भारतीयांची प्रथम पसंती या मौल्यवान धातूंना आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गत महिन्यात सोने व चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गत महिनाभर वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतलेल्या ग्राहकांची पावले घसरलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. लग्नसराईचे दिवस व भावातील घसरणीचा परिणाम म्हणून गत दोन दिवसांपासून सराफा बाजारात गर्दी वाढल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.