याला म्हणतात परतावा! टाटा ग्रुपच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! 1 लाखाचे झाले 6 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:28 PM2023-02-17T13:28:23+5:302023-02-17T13:37:36+5:30

या शेअरने आतापर्यंत 66600 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे.

शेअर बाजारच्या माध्यमाने आपणही कोट्यधीश होऊ शकता. यासाठी आपल्याकडे केवळ संयम असायला हवा. तर आज आम्‍ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देत आहोत, ज्याने त्याच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवण्याचा चमत्कार केली आहे.

या शेअरचे नाव आहे, टाटा एलेक्सी (Tata Elxsi). टाटा एलेक्सीने कोरोनानंतर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी 0.30% टक्क्यांच्या तेजीसह 6,670 रुपयांवर बंद झाला.

Tata Elxsi शेअर प्राइस हिस्ट्री - टाटा समुहाची स्क्रिप गेल्या एक वर्षापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये आहे, विशेषतः रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर. तथापि, गेल्या एका महिन्यात स्टॉक 6.64 टक्क्यांपर्यंत वाढल्याने या श्रेणीबद्ध ट्रेंडमधून बाहेर पडण्याची काही चिन्हे दिसून आली आहेत.

टाटा समूहाचा हा शेअर गेल्या एक वर्षापासून बेस बिल्डिंग मोडवर आहे. विशेषतः रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून. खरे तर, या शेअरने या रेंज-बाउंड ट्रेंडमधून बाहेर येण्याचे काही संकेत दिले आहेत. कारण हा शेअर गेल्या एका महिन्यात 6.64 पर्यंत वधारला आहे.

कोरोनानंतरच्या रिबाउंडमध्ये हा स्टॉक जवळपास तीन वर्षांत जवळपास 600 रुपयांवरून 6,670 वर पोहोचला आहे. या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 1011.67% एवढा परतावा दिला आहे.

1 मार्च 2013 रोजी हा शेअर 94 रुपयांवर होता. आज हा शेअर 6,670 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6995.74% एवढा परतावा दिला आहे. 1996 मध्ये या शेअरची किंमत केवळ 10 रुपये होती. या शेअरने आतापर्यंत 66600 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे.

गुंतवणूकदार मालामाल... - टाटा एलेक्सीच्या शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या काउंटरमध्ये 1996 मध्ये 10 रुपयांनुसार, 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला आतापर्यंत 6 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला असता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)