लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
याला म्हणतात बम्पर परतावा! केवळ 5 दिवसांत 50 टक्क्यांनी वधारला हा शेअर, पैसा लावणारे मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:48 IST
1 / 7शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार बघायला मिळतात. मात्र काही शेअर असेही असतात, जे आपल्या गुंतवणूकदारांना नियमितपणे चांगला परतावा देतात. आज आम्ही अपल्याला एका अशा शेअर संदर्भातत माहिती देणार आहोत, ज्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 5 दिवसांतच 50 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 7जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या 5 दिवसांपूर्वी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले असते तर त्याला तब्बल 50 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला असता. हा शेअर एका रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा आहे. या स्टॉकचे नाव आहे Omaxe Ltd.3 / 75 दिवसांत दिला 54 टक्के परतावा - या कंपनीच्या शेअरने गेल्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53.71 टक्क्यांचा अर्थात 26.45 रुपयांचा परतावा दिला आहे. हा शेअर आता 75.70 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 67.48 टक्क्यांनी वधारला आहे.4 / 7या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 110.20 रुपये तर निचांक 42.05 रुपये एवढा आहे. 20 सप्टेंबरला कंपनीचा शेअर 75.33 रुपयांवर बंद झाला होता. या कालावधीत हा शेअर 70 टक्क्यांनी वधारला आहे.5 / 7ओमेक्स शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 86.1 वर आहे. जे दर्शवते की, हा शेअर अधिकांश ओव्हरबॉट क्षेत्रात काम करत आहे. ओमेक्सचा शेअर 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्याही वर ट्रेंड करत आहेत. 6 / 7महत्वाचे म्हणजे, दिल्ली येथील ही Omaxe कंपनी उत्तर भारतातील लिडिंग रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)