'हे' आहेत या वर्षाचे ब्लॉकबस्टर IPO, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:01 IST2024-12-24T15:38:41+5:302024-12-24T16:01:46+5:30
Blockbuster IPO Of 2024: इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होतं. आर्थिक विकासाचा वेग, बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि रेग्युलेटरी इन्फ्रास्ट्रक्चरमधील सुधारणा यामुळे या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात मोठी तेजी दिसून आली.

Blockbuster IPO Of 2024: इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होतं. आर्थिक विकासाचा वेग, बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि रेग्युलेटरी इन्फ्रास्ट्रक्चरमधील सुधारणा यामुळे या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात मोठी तेजी दिसून आली. वर्षभरात कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून विक्रमी १.६ लाख कोटी रुपये उभे केले. ह्युंदाई मोटर इंडियाचा यावर्षी २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ होता. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे.
याशिवाय लार्ज, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांनी वर्षभरात शेअर इश्यूच्या माध्यमातून निधी उभारला. २०२४ मध्ये आयपीओचा सरासरी आकार वाढून १,७०० कोटी रुपये झाला. एकट्या डिसेंबरमध्ये आतापर्यंत किमान १५ आयपीओ आले आहेत. यावर्षी असे अनेक आयपीओ आले आहेत, ज्यांनी लिस्टिंगवर गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले. म्हणजेच त्यांचा लिस्टिंग नफा ९०-१००% प्रीमियमवर होता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
Bajaj Housing Finance IPO - बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर १६ सप्टेंबर रोजी बाजारात लिस्ट झाले. बीएसई आणि एनएसईवर हा शेअर १५० रुपयांवर लिस्ट झाला होता. त्याचा आयपीओ प्राइस बँड ७० रुपये प्रति शेअर होता. म्हणजेच त्याचा लिस्टिंग गेन ११४.२९ टक्के प्रीमियम होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी या शेअरने इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये १० टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि १८१.४८ रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. यामुळे आयपीओच्या ७० रुपयांच्या किमतीपेक्षा १५९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
Premier Energies IPO - प्रीमियर एनर्जीचे शेअर्स ३ सप्टेंबर २०२४ रोजी १२०.२२ टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले होते. ४५० रुपयांच्या आयपीओच्या तुलनेत हा शेअर ९९१ रुपयांवर लिस्ट झाला होता.
KRN Heat Exchanger & Refrigeration- केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशनचे शेअर्स २२० रुपयांच्या आयपीओ किमतीवरून २२३ टक्क्यांनी वधारून ७१०.१५ रुपयांवर पोहोचले. या शेअरने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आणि एनएसईवर ११८.१८ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४८० रुपयांवर लिस्ट झाला.
Unicommerce eSolutions IPO- युनिकॉमर्स ईसोल्यूशन्सचे शेअर्स १३ ऑगस्ट २०२४ रोजी ११२.९६% प्रीमियमवर लिस्ट झाले होते. आयपीओची किंमत १०८ रुपयांच्या तुलनेत हा शेअर २३० रुपयांवर लिस्ट झाला.
NACDAC Infrastructure Ltd IPO- बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर आज, २४ डिसेंबर रोजी नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर ९० टक्क्यांच्या प्रीमियमवर ६६.५० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर तो अपर सर्किटवर येऊन ६९.८२ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच पहिल्याच दिवशी १००% नफा झाला.
Waaree Energies IPO - वारी एनर्जीजच्या शेअर्सनं २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात बंपर एन्ट्री केली. वारी एनर्जीचा शेअर बीएसईवर २,५५० रुपयांवर सूचीबद्ध झाला, जो १,५०३ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ७० टक्के प्रीमियम आहे. त्याचप्रमाणे एनएसईवर आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत वारी एनर्जीचा शेअर २,५०० रुपयांवर सूचीबद्ध झाला. हे ६६.३३ टक्के अधिक आहे.
Lakshya Powertech IPO- लक्ष्य पॉवरटेकचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर १८० रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत ३४२ रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले.