'या' शेअर्सनं दिलं ३३० टक्क्यांपर्यंत रिटर्न, तरीही Rakesh Jhunjhunwala यांनी गुंतवणूक वाढवली नाही; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 04:33 PM2021-10-18T16:33:08+5:302021-10-18T16:39:58+5:30

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोमधील शेअर्सनं दिले ३३० टक्क्यांपर्यंत रिटर्न. पाहा कोणते आहेत ते शेअर्स

Big Bull राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलियोमध्ये असलेल्या शेअर्सपैकी पाच शेअर्सनं गेल्या एका वर्षात ३३० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत.

परंतु झुनझुनवाला यांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किमान मागील तीन तिमाहींपासून कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये Man Infraconstruction, NCC, Orient Cement, Wockhardt आणि Agro Tech Foods या शेअर्सचा समावेश आहे.

Man Infraconstruction च्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात ३३२ टक्क्यांची तेजी आली आहे. यामध्ये झुनझुनवाला यांचा १.२१ टक्के हिस्सा आहे आणि डिसेंबर २०१५ पासून त्यांनी यात कोणताही बदल केलेला नाही.

याशिवाय NCC च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात १५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये रेखा झुनझुनवाला यांचा १२.८४ टक्के हिस्सा आहे. गेल्या तिमाहितही त्यांचा यात इतकाच हिस्सा होता. Orient Cement मध्येही मार्च २०१६ पासून कोणताही बदल झालेला नाही, तर Ace Equity च्या आकडेवारीनुसार यात झुनझुनवाला यांचा १.२२ टक्के हिस्सा आहे.

औषध निर्मिती करणारी कंपनी Wockhardt नं या कंपनीच्या शेअर्सनं गेल्या १ वर्षात ५७ टक्के रिटर्न दिलेआहेत. या कंपनीत त्यांचा २.२६ टक्के हिस्सा आहे. तर दुसरीकडे झुनझुनवाला दांपत्याचा Agro Tech Foods मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत ८.२ टक्के हिस्सा होता. वर्षभरात या शेअर्समध्ये ४४ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

Trendlyne कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, या 5 कंपन्यांमधील झुनझुनवाला दांपत्याच्या भागभांडवलाचे मूल्य गुरुवारच्या ट्रेड नुसार १०४० कोटी रूपये इतकं आहे.

आकडेवारीनुसार त्यांनी गेल्या तिमाहीत ल्युपिनमधील आपल्या हिस्स्याची विक्री केली आणि Nalco, Canara Bank यांना आपल्या पोर्टफोलियोमध्ये सामील केलं. Trendlyne च्या आकडेवारीनुसार गुरूवारी त्यांच्या पोर्टफोलियोचं मूल्य २५३९३ कोटी रूपये होतं.