श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:26 IST2025-07-28T10:18:38+5:302025-07-28T10:26:52+5:30

जर तुम्हाला तुमचा मेहनतीचा पैसा गुंतवून श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला थोडी शिस्तबद्ध बचत करावी लागेल. तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर काय करावं लागेल जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

तुमच्यासोबतही असे घडते का की दर महिन्याला तुमचा पगार आल्यापासून काही दिवसांतच अचानक संपतो? तर तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दरमहा काही पैसे वाचवायचेत की भविष्यासाठी एक मजबूत निधी तयार करायचा आहे? जर हो, तर तुम्हाला दरमहा किमान १०,००० रुपये वाचवावे लागतील. जरी हे ध्येय आव्हानात्मक वाटत असलं तरी, काही शिस्तबद्ध सवयी आणि स्मार्ट आर्थिक निर्णयांनी ते सहजपणे साध्य करता येतं. ही केवळ बचत नाही तर चांगल्या आर्थिक भविष्याकडे पहिलं पाऊल आहे. तुम्ही दरमहा १०,००० रुपये कसे वाचवू शकता आणि या बचती गुंतवून तुम्ही तुमची संपत्ती कशी वाढवू शकता हे जाणून घेऊ.

इमर्जन्सी फंड: हे तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित आर्थिक संकटाचा (जसे की नोकरी गमावणे, वैद्यकीय आणीबाणी) सामना करण्यास मदत करेल. आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करा: घराचं डाउनपेमेंट, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा निवृत्ती यासारखी प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बचत करणं आवश्यक आहे. ताण कमी : हो, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमच्याकडे तुमची बचत आहे, तेव्हा आर्थिक ताण कमी होतो आणि तुम्हाला मानसिक शांती मिळते.

सर्वप्रथम, तुमच्या मासिक उत्पन्नाची आणि सर्व खर्चाची यादी बनवा. त्यात भाडं, ईएमआय, बिल (वीज, पाणी, गॅस) इत्यादींचा उल्लेख करा. हे तुम्हाला तुमचे पैसे कुठे जात आहेत हे स्पष्टपणे दाखवेल. हे तुम्हाला कमी करता येणारे अनावश्यक खर्च ओळखण्यास मदत करेल. यासाठी तुम्ही स्प्रेडशीट किंवा बजेटिंग अॅप वापरू शकता. तसंच, प्रत्येक श्रेणीसाठी एक मर्यादा निश्चित करा आणि तिचं पालन करण्याचा प्रयत्न करा.

पे युअरसेल्फ फर्स्ट: बचत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचा पगार मिळताच, दर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या बँकेला तुमच्या बचत खात्यातून १०,००० रुपये वेगळ्या बचत खात्यात किंवा गुंतवणूक खात्यात (जसं की SIP) आपोआप ट्रान्सफर होईल अशी व्यवस्था करा. असं केल्यानं, जेव्हा पैसे तुमच्या आवाक्याबाहेर जातील, तेव्हा तुम्ही ते खर्च करणं टाळाल. हे तुम्हाला शिस्तबद्ध राहण्यास मदत करेल आणि तुम्ही तुमच्या बचतीला प्राधान्य देण्यास शिकाल.

जर तुम्ही असे खर्च ओळखले जे 'आवश्यक' नाहीत तर 'गरजा' आहेत, तर तुम्ही पैसे वाचवू शकता. म्हणून बाहेरुन जास्त खाणं आणणं कमी करा. खरं तर, घरी शिजवलेले अन्न खाल्ल्यानं दरमहा २००० ते ३००० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. याशिवाय, प्लॅटफॉर्मची मेंबरशिप काढून टाका, यामुळे दरमहा १००० किंवा त्याहून अधिक रुपये वाचू शकतात. शक्यतोवर, कोणत्याही अनावश्यक वस्तू खरेदी करणं टाळा.

जर तुमचे खर्च कमी करणे पुरेसं नसेल, तर तुमचं उत्पन्न वाढवण्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही अर्धवेळ काम, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाइन शिकवणीचा पर्याय निवडू शकता. चांगली नोकरी किंवा बढती मिळावी म्हणून तुम्ही तुमचे कौशल्य वाढवलं पाहिजे.

तुमचे पैसे व्याज भरण्यासाठी जातात म्हणून तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी किंवा वैयक्तिक कर्ज यांसारखी उच्च व्याजदराची कर्जे तुमच्या बचत क्षमतेवर परिणाम करतात. म्हणून, जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते लवकर परत करा कारण व्याजावर वाचवलेले पैसे थेट तुमच्या बचतीकडे जातील.

म्हणून जर तुम्हाला भविष्यासाठी सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीनं गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट (RD) चा कमी जोखीम पर्याय निवडावा, ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोडी गुंतवणूक करून मोठा निधी तयार करू शकता. त्याच वेळी, एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात मोठा परतावा मिळतो. पीपीएफ केवळ करमुक्त नाही तर बचतीचे एक विश्वासार्ह साधन देखील आहे. यासोबतच, एनपीएस निवृत्तीसाठी नियमित उत्पन्न आणि कर सूटीचा लाभ देते.