१४३० ₹वर जाणार TATA चा शेअर! गुंतवणूकदार झालेत मालामाल; तुम्ही घेतला की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:23 PM2022-06-14T15:23:48+5:302022-06-14T15:28:57+5:30

शेअर बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीत टाटाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला असून, येत्या काळात नवा उच्चांक गाठू शकेल, असे सांगितले जात आहे.

TATA समूहातील अनेक कंपन्या आताच्या घडीला दामदार कामगिरी करत आहेत. एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, गुंतवणूकदाराना मोठे नुकसान होताना दिसत आहे.

मात्र, बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीत TATA च्या कंपनीचा शेअर वाढतच चालला आहे. काही रिपोर्टनुसार, टाटाच्या एका कंपनीचा हा शेअर तब्बल १४३० रुपयांवर जाऊ शकतो.

टाटा समूहातील रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Ltd) गेल्या काही वर्षांत त्यांच्या भागधारकांना प्रचंड परतावा दिला आहे. ब्रोकरेज कंपन्या ट्रेंट कंपनीबाबत उत्साही आहेत. चांगला परतावा प्रोफाइल आणि ग्राहकांच्या भावना पुनरुज्जीवित करण्यावर कंपनीचा भर यामुळे कंपनीचा शेअर वाढण्याची शक्यता आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

कंपनीने गत तिमाहीत स्टँडअलोन आधारावर जवळपास ५३ टक्के महसुली वाढ नोंदवली, जी पीअर रिटेल खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. याचे कारण म्हणजे हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने भारतीय बाजारपेठेत वाढ दिसून येत आहे.

ट्रेंट कंपनी Westside, Judio, Star, Zara सारखे ब्रँड चालवते. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला मागणी चांगली होती. कंपनी पुढील आर्थिक वर्षापर्यंत १३५ स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे.

मोतीलाल ओसवालनुसार, ट्रेंट कंपनीची कामगिरी त्याच्या स्पर्धकांपेक्षा खूप पुढे आहे. येत्या २ ते ३ वर्षात त्याची झपाट्याने वाढ होईल. त्याची लक्ष्य किंमत १४३० रुपये ठेवण्यात आली आहे, जी मागील बंदच्या तुलनेत २८ टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते.

ICICI डायरेक्टच्या मते, प्रीमियम मूल्यांकनांना मजबूत कामगिरी आणि कमाईतील मोठा पुनर्प्राप्तीद्वारे समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. त्याने स्टॉकसाठी रु. १,२७५ ची अल्पकालीन लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

आताच्या घडीला ट्रेंट कंपनीचा शेअर १,०८४.९५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख चढा ठेवताना दिसत आहेत. टाटावरील गुंतवणूकदारांचा विश्वास अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच कंपन्यांचे प्रदर्शनही उत्तम होत आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 'खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा' या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. म्हणून, एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो.