TATAची कमालच झाली! आता आणखी एका कंपनीचा IPO आणण्याची तयारी; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 22:39 IST
1 / 12शेअर मार्केट आताच्या घडीला विक्रमी पातळीवर पोहोचण्याच्या तयारीत आहे. शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहेत. असे असले तरी अनेकविध क्षेत्रातील मातब्बर कंपन्या IPO शेअर बाजारात सादर करत आहेत. यातच दिग्गज TATA ग्रुपनेही आपल्या आणखी एका कंपनीचा IPO बाजारात उतरवण्याची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. 2 / 12गेल्या काही महिन्यांपासून आयपीओचा धुमाकूळ शेअर बाजारात सुरू आहे. यातच गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून कमाईच्या नवीन संधीही मिळत आहेत. यात आता TATA समूहाच्या काही कंपन्या आहेत, ज्या IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात लिस्ट करण्यासाठी तयार आहेत.3 / 12TATA ग्रुपच्या टाटा प्ले आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची चर्चा होती, पण आता आणखी एक कंपनी या शर्यतीत सामील होताना दिसत आहे. एका अहवालानुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) ही कंपनीही IPO द्वारे शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते.4 / 12TEPL इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बनण्याच्या योजनेवर काम करत आहे. TATA समूहाच्या या कंपनीकडे इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीमध्ये दबदबा आहे आणि तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात उत्पादन प्रकल्प आहे. या टाटा कंपनीचा IPO लॉन्च होण्यास वेळ लागू शकतो, असेही सांगितले जात आहे. 5 / 12भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग २०२५ पर्यंत ३०० अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकतो, असा कयास बांधला जात आहे. दुसरीकडे, TATA प्लेने गोपनीय पद्धतीने आयपीओ संदर्भातील कागदपत्रे सेबीकडे सादर केली आहेत. सेबीने नवीन नियम लागू केल्यानंतर कंपनीला अशी कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.6 / 12दरम्यान, १८ वर्षांनंतर टाटा समूहाच्या एका कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. TATA कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) आयपीओ १८ वर्षांपूर्वी २००४ मध्ये आला होता. त्यानंतर आता टाटा समूह टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ (Tata Tech IPO) आणण्याच्या तयारीत आहे. टाटा टेक ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे.7 / 12TATA ची ही कंपनी सन २०२४ च्या पहिल्या तिमाहिती IPO आणण्याचा विचार करत आहे. कंपनी येत्या तिमाहीत सेबीकडे कागदपत्रे सादर करण्याची शक्यता असून आताच्या घडीला मर्चंट बँकर्सशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार TATA ची ही कंपनी इक्विटी ऑफरद्वारे किमान १० टक्के भाग विकण्याची शक्यता आहे.8 / 12TATA Tech कंपनी IPOद्वारे विक्रीसाठी ऑफर म्हणजेच OFS आणि नवीन शेअर्स दोन्ही जारी करू शकते. टाटा समूहाचे संस्थापक शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर देऊ शकतात. टाटा मोटर्सचे टाटा टेक्नॉलॉजीसमध्ये भागभांडवल ७२.४८ टक्के आहे. तर, सिंगापूरची कंपनी अल्फा टीसीची या कंपनीत ८.९६ टक्के हिस्सेदारी आहे.9 / 12TATA Tech प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिक यंत्रसामग्री आणि उद्योग क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. तर कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून जगभरात १८ वितरक केंद्रे आहेत. त्याच वेळी, त्यात ९,३०० कर्मचारी आहेत.10 / 12TATA Tech ही समूहाची एक नफ्यात असलेली कंपनी आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा टेकचा महसूल ३५२९.६ कोटी रुपये होता. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये सुमारे ७२ टक्के इक्विटी स्टेक असलेली टाटा मोटर्स ही सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे.11 / 12उर्वरित बहुतेक इक्विटी TATA समूहाच्या इतर घटक आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, मिझुहो सिक्युरिटीज द्वारे समर्थित सिंगापूर-निवासी गुंतवणूक फर्मच्या मालकीची आहे.12 / 12TATA नमकपासून ते TATA स्टीलपर्यंत टाटा समूहाच्या २९ कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. त्याचे एकूण बाजार भांडवल ३१४ बिलियन डॉलरच्या जवळपास आहे. (टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)