शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 2:59 PM

1 / 12
सुमारे वर्षभरापूर्वी TATA समूहातमध्ये ६ दशकांनंतर Air India ची घरवापसी झाली. यानंतर एयर इंडियाला जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम विमान कंपनी करण्यासाठी टाटा समूहाने कंबर कसली. एअर इंडियाच्या व्यवस्थापनापासून ते परिचालनापर्यंत अनेकविध गोष्टींमध्ये बदल करण्यात येत आहेत.
2 / 12
Air India चा प्रवास सुखकर, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, याकडेही TATA समूह भर देताना दिसत आहे. यातच आता टाटा समूह एअर इंडियाच्या ताफ्यात ५०० नवीन विमाने आणण्यासाठी जय्यत तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वांत मोठी खरेदी ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
3 / 12
रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात आला आहे की, TATA कंपनी Airbus A350S, Boeing 787S आणि Boeing 777S यांसारखी मोठी १०० विमाने तर दुसरीकडे ४०० लहान विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर देऊ शकते. एअर इंडियासाठी या विमानाची खरेदी किंमत सुमारे १०० अब्ज डॉलर असू शकते.
4 / 12
दशकभरापूर्वी अमेरिकन एअरलाइन्सने एकावेळी ४६० एअरबस आणि बोइंग जेट विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. Air India या डीलमध्ये मोठी सवलत कंपन्यांकडून देण्यात आली, तरी हा व्यवहार अब्जावधी डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5 / 12
कोरोना महामारीनंतर नागरी विमान उड्डाण क्षेत्र हळूहळू स्थिरावत असून, जेट विमानांना पुन्हा एकदा मोठी मागणी येऊ लागल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, एअरबस आणि बोईंग या कंपन्यांनी या कराराविषयी भाष्य करण्यास नकार दिला असून, TATA समूहाच्या मालकीच्या Air Indiaने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
6 / 12
५०० जेटच्या या नवीन ऑर्डरची डिलिव्हरीसाठी किमान १० वर्ष लागू शकतात. TATA समूहाने भारतातील विमान उड्डाण क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक योजनांवर काम करताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच, विस्तारा एअरलाइन्सच्या Air Indiaमध्ये विलीनीकरणास मान्यता देण्यात आली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने याला दुजोरा देत विस्तारा एअरलाइन्स टाटा सन्सच्या एअर इंडियामध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
7 / 12
TATA सन्सची सध्या विस्तारा एअरलाइन्समध्ये ५१ टक्के हिस्सेदारी आहे, तर सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. नवीन करारानुसार, सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये २५.१ टक्के भागीदारी असेल. सिंगापूर एअरलाइन्सच्या मते, कंपनी एअर इंडियामध्ये सुमारे २०५८ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. हा करार मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
8 / 12
या करारानंतर कंपनीला एअरलाइन्स क्षेत्रात वर्चस्व असलेल्या इंडिगोकडून कडवी टक्कर दिली जाईल, असेही मानले जात आहे. दरम्यान, आता Air India कंपनी आपल्या वाइड बॉडी विमानांचे आधुनिकीकरण करणार आहे. त्याच्या आतील भागांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे.
9 / 12
Air India कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी २७ बोईंग बी७८७-८ आणि १३ बी७७७ विमानांचे आतील भाग बदलणार आहे. आधुनिकीकरणाच्या या योजनेत सध्याच्या केबिनचे अंतर्गत भाग पूर्णपणे बदलले जातील. याचा अर्थ जुनी आसने अद्ययावत पिढीच्या आधुनिक आसनांनी बदलल्या जातील.
10 / 12
Air India विमाने आंतरराष्‍ट्रीय मार्गांवर चालत असल्याने सर्वोत्तम श्रेणीतील करमणुकीची सुविधा देण्यात येणार आहे. TATA समूहला Air India मधील आधुनिकीकरणाची ही प्रक्रिया २०२४ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या वाइड बॉडी विमानांमध्ये प्रीमियम इकॉनॉमी केबिन नव्हत्या. आता टाटा समूहाने प्रीमियम इकॉनॉमी केबिन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
11 / 12
TATA समूहाची आणखी एक विमान कंपनी असलेल्या विस्तारामध्येही ही व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे. या केबिनच्या निर्मितीमुळे अशा ग्राहकांना फायदा होईल. ज्या प्रवाशांना बिझनेस किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी आपल्या खिशाला कात्री लावायची नाही, ते कमी खर्चात प्रीमियम सुविधेचा आनंद घेऊ शकणार आहेत.
12 / 12
Air India ही देशाची ध्वजवाहक विमान कंपनी असल्याने काही विमानांमध्येही अशी व्यवस्था करावी लागणार आहे. आमच्या Vihaan. एअर इंडिया परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एअर इंडिया जागतिक दर्जाच्या विमान कंपनीला साजेशी उत्पादने आणि सेवांचे उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले होते.
टॅग्स :TataटाटाAir Indiaएअर इंडियाRatan Tataरतन टाटा