By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:44 IST
1 / 10मंज़िल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है!! पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है...ही वाक्य आहेत आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर स्वत:चं नशीब बदलणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट आहे. ही कहाणी आहे ग्वालियरच्या सीमा बंसल यांची...2 / 10सीमा सांगतात की, माझ्या वडिलांचं निधन झाले होते तेव्हा मी दीड वर्षाची होते. आमची परिस्थिती इतकी खराब होती की माझ्या आईकडे वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसे नव्हते. आमच्या घरात एक सीलिंग फॅन होता. जो माझ्या आईने १७० रुपयांना विकला. त्याच पैशातून वडिलांवर अंत्यसंस्कार केले. 3 / 10आज वेळ पूर्णपणे बदलली आहे. सीमा एक पॅकेजिंग उद्योग चालवतात. आपल्या हिंमतीवर आणि धडाडीने त्यांनी एक अशी कंपनी उभी केली जी आज संपूर्ण भारत आणि युएईमध्ये पसरली आहे. त्यांनी कधी हार मानली नाही. अनेक आव्हानांचा सामना केला. जिद्द, चिकाटीने एका छोट्या कंपनीपासून केलेली सुरुवात आज १५७ कोटींच्या कंपनीपर्यंत पोहचली आहे.4 / 10सीमा बंसल यांच्या कंपनीचे नाव DCG Tech Limited आहे. त्या कंपनीच्या फाऊंडर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. सीमा बंसल जेव्हा पहिल्यांदा पॅकेजिंग उद्योग सुरू करण्याचा विचार करत होत्या, तेव्हा त्यांच्या हातात कुठलेही इतर काम नव्हते. त्या बेरोजगार होत्या. त्यांच्याकडे भाग भांडवलही नव्हते. सीमा यांनी त्यांच्या घरातील छोट्या डेस्कपासून काम सुरू केले आणि स्वत: सगळे काम करत होती. त्या वाहन चालवायच्या, साहित्य विकायच्या. हिशोब त्याच ठेवत होत्या. हेल्पर ते मॅनेजर सगळे काही एकटे करायच्या. 5 / 10सीमा यांनी त्यांच्या मेहनतीने कंपनी मोठी केली. सीमा बंसल यांची कंपनी आज भारतातील पॅकेजिंग इंडस्ट्रीतील एक मोठं नाव बनले आहे. त्यांची कंपनी पॅकेजिंग सॉल्यूशन देतात. त्यांच्याकडे ५० हजाराहून अधिक ग्राहकांना टिकाऊ आणि टेक्नोलॉजी पॅकेजिंग देतात. जे आज बदलत्या उद्योगाची आवश्यकता पूर्ण करतात.6 / 10सीमा यांचे बालपण संकटांनी भरले होते. वडिलांच्या जाण्यानंतर आईने चारही मुलांचा सांभाळ एकटीने केला. त्या संगीत शिकवून पैसे कमवायच्या. चारही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवले. परंतु जशी मुले मोठी होऊ लागली तेव्हा शिक्षणाचा खर्च वाढला. त्यामुळे आईला सर्वांना सांभाळणे आणखी कठीण झाले.7 / 10शिक्षणाचा खर्च वाढला तेव्हा आईने सीमा यांना सरकारी शाळेत टाकले. तिथे शिक्षणाची पद्धत बदलली. सीमा यांना कुणीही मित्रमैत्रिणी नव्हते. ६ महिने शाळेतही गेल्या नाहीत जेव्हा त्या शाळेत परतल्या तेव्हा त्यांनी क्लासमध्ये टॉप केले होते. सुरुवातीला कठीण परिस्थितीत जीवन जगल्यानंतर त्या भावासोबत मुंबईला आल्या. इथे एका झोपडीत त्या राहिल्या. 8 / 10सीमा यांनी छोटी मोठी कामे सुरू केली. अखेर एका आयटी कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. जी त्यांच्यासाठी मोठी संधी होती. याच ऑफिसमधून त्यांना लंडन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या लंडनला गेल्या. लंडनमध्ये अनेक वर्ष त्यांनी नोकरी केली. त्याच काळात त्यांची एकाशी मैत्री झाली. पुढे मैत्रीतून प्रेम झाले आणि दोघांनी लग्न केले.9 / 10लग्नानंतर पतीसोबत सीमा अमेरिकेत गेल्या. तिथे वॉल स्ट्रीटवर एका इमारतीत ऑफिस उघडले. उद्योग हळूहळू नावारुपाला आला. त्यानंतर ३ मजली ऑफिस त्यांनी खरेदी केले. बँक ऑफ अमेरिकेत नोकरी मिळाली आणि त्यांना ग्रीन कार्डही मिळाले. काही वर्षांनी सीमा यांच्या पतीला उद्योगात नुकसान झाले. त्यात या दोघांनी सर्व काही गमावले. मग दोघेही भारतात परतले. 10 / 10भारतात आल्यानंतर पतीने जी काही शिल्लक रक्कम होती ती एका कंपनीत गुंतवली. सीमा या बेरोजगार होत्या. लंडनमध्ये राहताना त्यांच्या घरी पॅकेजिंगचे एक कॅटलॉग यायचे. त्यामुळे भारतात आपण हा बिझनेस सुरू करूया असा विचार त्यांच्या मनात आला. पॅकेजिंग इंडस्ट्रीचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. सीमा यांनी DCG Pac ची सुरुवात केली. आज ती कंपनी १५७ कोटी वार्षिक उलाढाल करणारी बनली आहे.