केवळ ₹2 च्या शेअरची कमाल! आता ₹400 वर पोहोचला भाव; 1 लाख लावणाऱ्यांना 4 वर्षात केलं करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:31 AM2024-04-03T11:31:55+5:302024-04-03T12:06:54+5:30

या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार केवळ चार वर्षांतच करोडपती झाले आहेत.

शेअर बाजार हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मात्र असे असले तरी, यात काही शेअर असेही आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीतच मालामाल केले आहे. तर काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मालामाल केले आहे.

असाच एक शेअर आहे, SG Finserve कंपनीचा. या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार केवळ चार वर्षांतच करोडपती झाले आहेत.

430 रुपयांवर पोहोचला आहे शेअर - वर्ष 1994 मध्ये सुरू झालेली एसजी फिनसर्व्ह लिमिटेड (SG Finserve Ltd) ब्रोकिंग, डिस्ट्रिब्यूटर्स, इन्व्हेस्टमेन्टसह फंड मॅनेजमेन्ट, इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग आणि इन्शुरन्स सर्व्हिसेस पुरवते. या शेअरने केवळ चार वर्षांच्या बिझनेसमध्ये 2 रुपयांपासून ते 430 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला आहे.

गेल्या 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत केवळ 2.80 रुपये होती. जी मंगळवारी शेअर बाजारातील (Share Market) व्यवहार संपेपर्यंत 431.80 रुपयांवर पोहोचली.

1 लाखाचे झाले 1.5 कोटी रुपये - एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचे मार्केट कॅपिटलायझेशन 2260 कोटी रुपये एवढे आहे. गेल्या केवळ चार वर्षांत या शेअरने तब्बल 16,000 टक्के एवढा परतावा दिला आहे.

यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 2.80 रुपयांच्या भावा प्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर या कालावधीत तिचे मूल्य 1.5 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले असते.

स्टॉकची कामगिरी - या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीतच मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरच्या कामगिरीसंदर्भात विचार करता, गेल्या केवळ चार वर्षांतच या शेअरची किंमत जवळपास 428.85 रुपयांची तेजी दिसून आली आहे आणि आपल्या गुंतवणूकदारांना 14,537 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 748 रुपये एवढा आहे. तर नीचांक 384.95 रुपये आहे. (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)