₹300 पार जाणार मुकेश अंबानींचा शेअर? कंपनीनं जारी केले तिमाही निकाल, एक्सपर्ट बुलिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:58 IST2025-01-18T13:47:41+5:302025-01-18T13:58:51+5:30
या तिमाहीत कंपनीचा नफा 295 कोटी रुपयांवर स्थिर राहिला. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 294 कोटी रुपये नफा मिळवला होता.

मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 295 कोटी रुपयांवर स्थिर राहिला. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 294 कोटी रुपये नफा मिळवला होता.
महत्वाचे म्हणजे, तिमाही निकाल फारसा बदल नसतानाही, या शेअरवर एक्सपर्ट बुलिश आहेत. हा शेअर पुन्हा एका 300 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कंपनीचे एकूण उत्पन्न - डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 449 कोटी रुपयांवर पोहोचले. जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 414 कोटी रुपये होती. एकूण खर्चातही वार्षिक आधारावर वृद्धी दिसून आली आहे. हा खर्च वाढून 131 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 99 कोटी रुपये होता.
डिसेंबरला संपलेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात किरकोळ सुधारणा होऊन तो 1,296 कोटी रुपये झाला. गेल्या एक वर्षापूर्वी, याच कालावधीत तो 1,294 कोटी रुपये होता.
शेअरचा परफॉर्मन्स - जियो फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर गेल्या शुक्रवारी 0.70% ने वाढून 278.75 रुपयांवर बंद झाला. तसेच ट्रेडिंग दरम्यान तो 275.70 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचला. एप्रिल 2024 मध्ये हा शेअर 394.70 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता.
शेअरची टार्गेट प्राइस - केआर चोकसी फिनसर्व्हने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसच्या शेअरसाठी 345 रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे. या शेअरला 'होल्ड' रेटिंग देण्यात आली आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की, या कव्हरेजअंतर्गत कंपनीसाठी संपत्तीची गुणवत्ता चिंताजनक राहण्याची शक्यता आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)