पैसे कमावण्याचे 10 मार्ग; घरी बसून होईल 50 हजार ते 1 लाख रुपयांची कमाई!

Published: May 12, 2021 01:19 PM2021-05-12T13:19:13+5:302021-05-12T13:35:09+5:30

start these 10 business and earn more profit : सुरुवातीला व्यवसायात तुम्ही 50 हजार किंवा 1 लाख रुपयांचे भांडवल गुंतवून हे व्यवसाय सुरू करू शकता.

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याची योजना आखत असाल किंवा तुम्ही घरी बसून पैसे कमावण्याच्या मार्ग शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा 10 व्यवसायांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा लाखों रुपयांची कमाई करू शकता.

सुरुवातीला व्यवसायात तुम्ही 50 हजार किंवा 1 लाख रुपयांचे भांडवल गुंतवून हे व्यवसाय सुरू करू शकता. विशेष म्हणजे या सर्व व्यवसायांसाठी तुम्हाला कोणत्याही विशेष किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता लागणार नाही.

तुमच्याकडे गाय किंवा म्हशी असल्यास तुम्ही दुधाचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे गाय किंवा म्हैस नसेल तर तुम्हाला 30 हजार रुपयांपर्यंत गाय मिळेल. तसेच, एक म्हैस 50 ते 60 हजारांपर्यंत मिळते. तर तुम्ही आपला व्यवसाय 2 गायी किंवा म्हशींनी सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही दुध डेअरी किंवा कंपन्यांशी करार करू शकता.

या व्यतिरिक्त तुम्ही फुलांचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. आजच्या काळात लग्नापासून छोट्या कार्यक्रमांपर्यंत फुलांची गरज भासते. यावेळी चांगल्या फुलांची मागणी खूप जास्त आहे. याशिवाय तुम्ही ऑनलाईन फुलेही विकू शकता. सूर्यफूल, गुलाब, झेंडूची लागवड खूप फायदेशीर आहे.

तुमच्याकडे जमीन असल्यास तुम्ही शिशम, सागवान अशी मौल्यवान झाडे लावू शकता. ही झाडे 8 ते 10 वर्षानंतर आपल्याला चांगली कमाई करतात. आजच्या काळात एक शिशमचे झाड 40 हजारांपर्यंत विकले जाते, तर सागवानचे झाड त्यापेक्षा अधिक महाग आहे.

तुम्ही मधमाश्या पाळण्याचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. केवळ एक ते दीड लाख रुपये खर्च करून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता, परंतु हा व्यवसाय चालविण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागेल.

तुम्ही भाजीपाला पिकवूनही चांगले उत्पन्न मिळवू शकता. आपल्याला यासाठी खूप जागेची देखील आवश्यकता नाही. या प्रकारच्या शेतीसाठी सरकारही मदत करत आहे. या शेतीत तुम्ही बंपर कमाई करू शकता.

कुक्कुटपालन व्यवसाय हा असा व्यवसाय आहे, ज्यासाठी तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल. सध्या सरकारकडून मुद्रा कर्ज मिळते. ज्याद्वारे तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकता.

बांबू लागवडीद्वारेही तुम्ही चांगली कमाई करू शकता. आजच्या काळात लोकांना बांबूची उत्पादने खूप आवडतात. याशिवाय ऑनलाइन साइट तयार करुन तुम्ही तुमचे उत्पादन चांगल्या दरातही विकू शकता.

तुम्ही घराजवळील बागेतच मशरूमची लागवड सुरू करू शकता, थोडेसे गुंतवणूक आणि कमी मेहनतीने तुम्ही 50 हजारांपर्यंत कमावू शकता.

तुम्ही मासेमारीचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

कोरफडांची झाडे लावून तुम्ही शेती करू शकता. तुम्ही केवळ 10 हजार रुपये खर्च करून सुमारे 2500 रोपे लावू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ही झाडेही विकू शकता किंवा सध्या कोरफड जेल जवळजवळ सर्व घरात वापरली जाते, तर तुम्ही जेल काढून सुद्धा पैसे कमवू शकता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!