Solar91 Cleantech IPO Update: 'बीएसई'चा 'सोलार९१ क्लीनटेक'ला झटका! आयपीओ का रोखला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 20:41 IST2024-12-23T20:30:25+5:302024-12-23T20:41:14+5:30
Solar91 Cleantech IPO Latest Update: खुला होण्यापूर्वीच सोलार९१ क्लीनटेक कंपनीचा आयपीओ बीएसईच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. या एसएमई आयपीओला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्थगिती दिली आहे.

१०६ कोटी रुपयांचा सोलार91 क्लीनटेक आयपीओ बीएसईने पुढील सूचना देईपर्यंत स्थगित कला आहे. हा एसएमई आयपीओ २४ डिसेंबर रोजी खुला होणार होता, पण एक दिवस आधी म्हणजे २३ डिसेंबर रोजी तो रोखण्यात आला.
प्राइज बँड १९५ असलेल्या या एसएमई आयपीओचा जीएमपी १०० रुपयांवर ट्रेंड करत होता. म्हणजे ५१ टक्क्यांपेक्षा अधिक नफा गुंतवणुकदारांना मिळण्याचे संकेत ग्रे मार्केट प्रीमिअममधून मिळत होते. त्यातच बीएसईने ही कारवाई केली आहे.
बीएसईने याबद्दल म्हटलं आहे की, "तक्रारदारांनी मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने याची अधिक चौकशी होणे गरजेचे आहे. पुढील चौकशी लांबणार असल्याने एंकर गुंतवणुकदारांसाठी आज (२३ डिसेंबर) आणि रिटेल गुंतवणुकदारांसाठी उद्यापासून (२४ डिसेंबर) खुला होणारा आयपीओ पुढील सूचना देईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे."
ईपीसी सोलार एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडरची सोलार91 क्लीनटेक कंपनी आहे. कंपनीत प्रमोटर्सची ६९.७५ भागीदारी आहे. उर्वरित ३०.२५ भागीदारी कृष्ण कुमार पंत आणि टिकरी इन्व्हेस्टमेंट्ससह सार्वजनिक गुंतवणुकदारांकडे आहे.
सोलार91 क्लीनटेक कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली आहे. कंपनीची स्थापना राजस्थानातील चार आयआयटीयन्सने (सौरभ व्यास, प्रतीक अग्रवाल, धवल गौरांग वासवदा आणि संदीप गुरनानी) केली होती.
ग्रीड आणि ग्रीड सोलार एनर्जी प्रोडक्टस् तयार करण्याचे आणि त्याची देखभाल करण्याचे काम कपंनी करते.
कंपनीने स्वतंत्र वीज निर्मितीतंर्गत दोन प्रोजक्ट्सही सुरू केले आहेत. संपूर्ण भारतात कंपनी ९४ + मेगावॅट क्षमतेचे प्लँट सुरू केले आहे.