SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 08:59 IST2025-07-05T08:49:04+5:302025-07-05T08:59:16+5:30
Investment Tips: तुम्ही खूप मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल, तरीही थोडी गुंतवणूक करायलाच हवी. जर तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही दीर्घकाळात ४९ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.

Investment Tips: थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. गुंतवणुकीच्या बाबतीतही हे लागू होते. तुम्ही खूप मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल, तरीही थोडी गुंतवणूक करायलाच हवी. जर तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही दीर्घकाळात ४९ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. तुम्हाला फक्त दीर्घकाळ शिस्तबद्धपणे गुंतवणूक करायची आहे आणि थोडा संयम बाळगायचा आहे. ही चक्रवाढीची शक्ती आहे जी लहान रकमेचेही मोठ्या रकमेत रूपांतर करू शकते. चला समजून घेऊया की ही जादू कशी घडेल.
दरमहा फक्त ५०० रुपये गुंतवून ४९ लाख रुपयांचा निधी उभा करणं शक्य आहे, जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक केली ज्याच्या परताव्यात महागाईवर मात करण्याची क्षमता आहे. यासाठी आजच्या काळात एसआयपी हा एक चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक एसआयपीद्वारे केली जाते.
५०० रुपये ही इतकी छोटी रक्कम आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या खिशातूनही ती गुंतवू शकता. ५०० रुपयांमधून ४९ लाख जोडण्यासाठी, तुम्हाला किमान ४० वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल.
जर तुम्ही ४० वर्षांसाठी दरमहा ५०० रुपये गुंतवले तर ४० वर्षांत तुम्ही एकूण २,४०,००० रुपये गुंतवाल. ही गुंतवणूक कधी होईल हे तुम्हाला समजणारही नाही. एसआयपीमध्ये सरासरी परतावा १२% मानला जातो. १२ टक्के दरानं, तुम्हाला केवळ व्याजातून ४६,५६,५३६ रुपये मिळतील. ४० वर्षांनंतर, मॅच्युरिटी रक्कम आणि गुंतवलेली रक्कम जोडल्यास, एकूण ४८,९६,५३६ रुपये म्हणजेच सुमारे ४९ लाख रुपयांचा निधी तयार होईल.
जर तुम्हाला SIP द्वारे मोठा निधी निर्माण करायचा असेल, तर शिस्तबद्ध गुंतवणूक आवश्यक आहे. मध्येच ब्रेक घेऊ नका किंवा SIP थांबवू नका. नियमित गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवा. मोठा निधी निर्माण करण्यासाठी नियमित गुंतवणूक सुरू ठेवणं खूप महत्वाचं आहे.
एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे आणि ती जोखमीच्या अधीन असते. मार्केटमध्ये मंदीच्या भीतीनं एसआयपी थांबवू नका. मार्केटमध्ये मंदी असताना तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात आणि नंतर जेव्हा मार्केट तेजीत येते तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून अधिक परतावा मिळतो, म्हणून तुमची एसआयपी सतत सुरू ठेवू शकता.
एसआयपी ही एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यात परताव्याची कोणतीही हमी नाही. येथे गणना सरासरी १२% परताव्याच्या आधारावर केली गेली आहे. तुम्हाला १४ किंवा १५ टक्के किंवा त्याहूनही चांगला परतावा मिळू शकतो आणि ५०० रुपये गुंतवून तुम्ही आणखी मोठा फंड तयार करू शकता. परंतु जर हा परतावा सुमारे १० किंवा ११ टक्के झाला तर नफा देखील थोडा कमी असू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)