SIP Calculator: ५०० रुपयांच्या SIP मधून ५, १०, २०, २५ आणि ३० वर्षांत किती मिळेल रिटर्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:37 IST2025-01-28T10:23:46+5:302025-01-28T10:37:07+5:30
SIP Investment : गेल्या काही काळापासून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने एसआयपी खूप चांगली मानली जाते.

SIP Investment : गेल्या काही काळापासून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने एसआयपी खूप चांगली मानली जाते. केवळ ५०० रुपयांपासून तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.
ही एक अशी रक्कम आहे जी अगदी कमी कमावणारी व्यक्तीदेखील सहजपणे गुंतवू शकते. असं मानलं जातं की आपण एसआयपीमध्ये जितकी जास्त काळ गुंतवणूक कराल तितका जास्त नफा कमवाल. महिन्याला ५०० रुपयांच्या एसआयपीमधून ५, १०, २०, २५ आणि ३० वर्षात तुम्ही किती कमाई कराल ते जाणून घेऊ.
एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. जर तुम्ही ५ वर्षांसाठी ५०० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एकूण ३० हजार रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला ११,२४३ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ४१,२४३ रुपये मिळतील.
जर तुम्ही सलग १० वर्षे एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर १० वर्षात तुम्ही एकूण ६० हजार रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला ५६,१७० रुपये व्याज मिळेल. १० वर्षांनंतर तुम्हाला एकूण १,१६,१७० रुपये मिळतील.
जर तुम्ही सलग ५०० रुपयांची एसआयपी १५ वर्षे चालवत असाल तर तुम्ही९० हजार रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला व्याजातून १,६२,२८८ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला एकूण २,५२,२८८ रुपये मिळतील.
सलग २० वर्षे एसआयपीमध्ये दरमहा ५०० रुपये गुंतवल्यास एकूण १,२०,००० रुपयांची गुंतवणूक होईल. १२ टक्के दरानं तुम्हाला दुप्पट व्याज मिळेल. हे व्याज ३,७९,५७४ रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही २० वर्षात एकूण ४,९९,५७४ रुपयांची कमवाल.
५०० रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला २५ वर्षात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त परतावा मिळेल. २५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक १,५०,००० रुपये असेल. १२ टक्के दरानं ७ लाख ९८ हजार ८१८ व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ९,४८,८१८ रुपये मिळतील.
जर तुम्ही सलग ५०० रुपयांची एसआयपी ३० वर्षे चालू ठेवली तर ३० वर्षांत तुम्ही फक्त १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के परताव्यानुसार १५ लाख ८४ हजार ९५७ रुपये केवळ व्याजातून मिळतील. अशा प्रकारे ३० वर्षांत तुम्ही १७,६४,९५७ रुपये मिळतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)