तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय? 'हे' काम करा, टेन्शन संपेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:55 IST2025-02-20T16:53:12+5:302025-02-20T16:55:26+5:30

improve your credit score : जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी सहज कर्ज मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्ज घेणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. लग्नापासून हनीमूनपर्यंत आणि घरापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत असे कर्जाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. सध्याच्या काळात कर्ज घेतलं नाही, असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. पण, कर्ज बोलायला जितकं सोपं आहे, तितकेच मंजुर होण्यासाठी अवघड आहे. तुम्ही देखील कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत आहात, पण मिळत नाही अशी परिस्थिती आहे का? असं असेल तर आता टेन्शन सोडा आणि हा लेख वाचा.

कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केल्यानंतर पहिल्यांदा तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जातो. हा स्कोअर तुमच्या कर्जाचा इतिहास सांगतो. तो, जर ७५० पेक्षा जास्त असेल तर काही अडचण नाही. पण, कमी असेल तर कर्ज मिळण्यात अडचणी येतात.

तुमचे सध्याचे कर्ज आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे फार महत्वाचे आहे. उशीरा पेमेंटमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. यासाठी तुम्ही पेमेंट करण्यासाठी अलर्ट आणि ऑटो-डेबिटची सुविधा वापरू शकता.

वारंवार क्रेडिट स्कोअर तपासल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे शक्यतो टाळा.

तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा कमी खर्च करा. यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या ३०% किंवा त्याहून कमी वापरावे. समजा तुमच्या कार्डची मर्यादा १ लाख असेल. तर तुम्ही ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करू शकता.