या 5 शेअर्सचे व्यवहार अचानक बंद, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; कारण काय? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:53 IST2025-01-08T17:48:53+5:302025-01-08T17:53:26+5:30
Share Market : या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता.

Share Market : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे, तर काहींनी अतिशय खराब कामगिरी केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे, परंतु सध्या या शेअर्सचे सर्व व्यवहार बंद आहेत.
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड-दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स 1.88 रुपयांवर बंद झाले. त्याचा शेवटचा व्यवहार 6 जानेवारी रोजी झाला होता. पाच वर्षांत त्याचा परतावा 122% आहे.
भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेड-भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार सध्या बंद आहेत. त्याची शेवटची ट्रेडिंग किंमत 1236.45 रुपये होती. गेल्या महिन्यापासून त्याचा व्यवहार बंद आहे. कंपनीच्या शेअर्सने वर्षभरात मल्टीबॅगर परतावा दिला होता.
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड-ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडच्या शेअर्सचे शेवटचे व्यवहार गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी झाले होते. या दिवशी हा शेअर 10.28 रुपयांवर बंद झाला. हा शेअर पाच वर्षांत 295% वाढला आहे.
रिलायन्स कॅपिटल लिमिटेड-अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटलचा शेअर 11.79 रुपयांवर बंद झाला. सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमुळे अनेक महिन्यांपासून व्यापार बंद आहे.
जेपी इन्फ्राटेक लिमिटेड-दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेपी इन्फ्राटेक लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार सध्या बंद आहेत. त्याची शेवटची ट्रेडिंग रु 1.27 आहे.