याला म्हणतात धमाका! ₹1 चा शेअर ₹87 वर आला, खरेदीसाठी तुटून पडले लोक; आता कंपनीला मिळाली मोठी गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:26 PM2024-04-07T19:26:04+5:302024-04-07T19:35:50+5:30

गेल्या 10 वर्षांचा विचार करता, हा स्मॉल-कॅप स्टॉक ₹1.50 वरून ₹87 वर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरने तब्बल 5,700 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

पॅरामाउंट कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर (Paramount Communications Ltd) उद्या म्हणजेच सोमवारी फोकसमद्ये राहण्याची शक्यता आहे. कारण जागतिक पातळीवरील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी आयसीआरएने (ICRA) रेटिंग अपडेट केले आहे.

भारतीय शेअर बाजार शुक्रवारी बंद झाल्यानंतर, ICRA ने कंपनीला ₹150 कोटींच्या बँक सुविधेसाठी 'बीबीबी-' अथवा 'ट्रिपल बी मायनस' असे दीर्घकालीन रेटिंग दिले असल्याची माहिती मल्टीबॅगर स्टॉकने भारतीय एक्सचेंजसना दिली आहे. यामुळे सोमवारी मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजीची आशा आहे.

शेअरनं दिलाय छप्परफाड परतावा - प्राइस हिस्ट्रीनुसार, पॅरामाउंट कम्युनिकेशन्सचा शेअर शुक्रवारी बीएसईवर जवळपास ₹79 वरून ₹87 वर पोहोचला आहे. अर्थात या शेअरमध्ये 10% ची तेजी होती. तर, गेल्या सहा महिन्यांत हा शेअर जवळपास ₹63 वरून ₹87 वर पोहोचला आहे. ही जवळपास 35 टक्के एवढी तेजी आहे.

गेल्या एका वर्षात या शेअरने 150 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक जवळपास ₹11.35 वरून ₹87 वर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने जवळपास 665 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

10 वर्षांत दिल 5,700 टक्क्यांचा परतावा - गेल्या 10 वर्षांचा विचार करता, हा स्मॉल-कॅप स्टॉक ₹1.50 वरून ₹87 वर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरने तब्बल 5,700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. अर्थात 10 वर्षांत या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 58 लाख रुपये केले आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)