याला म्हणतात रिटर्न...! ₹61 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिलाय 17757% परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:36 IST2025-02-27T17:29:31+5:302025-02-27T17:36:40+5:30
असाच एक शेअर म्हणजे, न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 वर्षांतच जवळपास 18000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.

शेअर बाजार म्हणजे अनिश्चिततेचा बाजार असे म्हटले जाते. मात्र, शेअरबाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्लावदीतच मालामाल केले आहे. अगदी कोट्यधीश बनवले आहे.
असाच एक शेअर म्हणजे, न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 वर्षांतच जवळपास 18000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
असा आहे शेअरचा परफॉर्मन्स - सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर जवळपास ₹ ११००० वर व्यवहार करत आहेत. १३ वर्षांपूर्वी हा शेअर ६१ रुपयांवर होती.
अर्थात या शेअर ने गेल्या १३ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास १७,७५७ टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. म्हणजेच, तेरा वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये ₹१ लाखांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे ₹१.८७ कोटी एवढे झाले असते.
सध्या अशी आहे शेअरची स्थिती - न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर गुरुवारी (२७ फेब्रुवारी) एनएसईवर ६ टक्क्यांहूनही अधिक घसरून ₹ १०,९१५ वर व्यवहार करत होता. गेल्या एका वर्षात न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली.
गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअर्सची किंमत ११ टक्क्यांनी, तर गेल्या एका महिन्यात १९.१३ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. वार्षिक आधारावर न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरची किंमत ₹१४,२९४ वरून ₹१०,९१५ प्रति शेअरवर आली आहे. ही २३.६४ टक्क्यांहून अधिकची घट आहे.
शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सकडे कंपनीची 32.68 टक्के एवढा वाटा आहे. तसेच, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 67.32 टक्के एवढ वाटा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)