याला म्हणतात ढासू परतावा...! १ लाख लावले, ५ वर्षांत ₹९१ लाख झाले! दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:58 IST2025-01-23T12:48:58+5:302025-01-23T12:58:23+5:30
एखाद्या गुंतवणूकदाराने 24 जानेवरी 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता ती 91 लाख 91 हजार रुपये झाली असती...

शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक मानली जाते. मात्र, यातील काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असाच एक शेअर म्हणजे, दारू बनवणारी कंपनी पिकाडिली अॅग्रोचा (Piccadily Agro Share).
या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांची गुंतवणूक आता वाढून 91 लाख रुपयांहूनही अधिक झाली आहे.
8 रुपयांचा शेअर ₹788 पार - पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडची (PAIL) सुरुवात १९९४ मध्ये झाली. ही एक भारतीय कंपनी असून मद्य निर्मिती करते.
या कंपनीच्या सिंगल माल्ट व्हिस्की इंद्रीने अनेक पदके जिंकली आहेत. तर दुसऱ्या बाजूला, या कंपनीचा शेअर मल्टीबॅगर परतावा देत गुंतवणूकदारांनाही मालामाल करत आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी २४ जानेवारी २०२० रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत केवळ ८.५८ रुपये एवढी होती. जी आतापर्यंत ७८० रुपयांनी वाढली आहे.
शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, हा शेअर घसरणीनंतर ७८८.६० रुपयांवर बंद झाला. यावरूनच, हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना कशा प्रकारे मालामाल करत असेल, याचा अंदाज येऊ शकतो.
दिला 9091.14 टक्के परतावा - हा शेअर सध्या 8 रुपयांवरून 788 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या शेअरने 9091.14 टक्के परतावा दिला आहे. अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने 24 जानेवरी 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता ती 91 लाख 91 हजार रुपये झाली असती.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)