याला म्हणतात 'छप्परफाड' परतावा...! ₹1 लाखाचे केले ₹84 लाख; 11 महिन्यांत 8300% ने वधारला हा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 20:00 IST2025-03-14T19:54:28+5:302025-03-14T20:00:05+5:30

महत्वाचे म्हणजे, केवळ 11 महिन्यांतच कंपनीचा शेअर 8300 पर्सेंटने वधारला आहे...

शेअर बाजारातील कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनने आपल्या शेअरधारकांना 'छप्परफाड' परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ 11 महिन्यांतच कंपनीचा शेअर 8300 पर्सेंटने वधारला आहे.

या कालावधीत कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून 159 रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअरने गुरुवारी 13 मार्च 2025 रोजी 52 आठवड्यांतील आपला नवा उच्चांक गाठला आहे. या शेअरचा नीचांक 1.80 रुपये आहे.

1 लाखाचे केले 84 लाख रुपये - कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनचा शेअर (Kothari Industrial) 2 एप्रिल 2024 रोजी 1.89 रुपयांवर होता. तो 13 मार्च 2025 रोजी 159.25 रुपयांवर बंद झाला. गेल्या 11 महिन्यांत कोठारी इंडस्ट्रियलचा शेअर 8325 टक्क्यांनी वधारला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 2 एप्रिल 2024 रोजी कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्या 1 लाख रुपयांचे मूल्य 84.25 लाख रुपये झाले असते.

सहा मिन्यांत 600% हून अधिकचा परतावा - कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 602 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर 16 डिसेंबर 2024 रोजी 22.68 रुपयांवर होता. तो 13 मार्च 2025 रोजी 159.25 रुपयांवर बंद झाला.

गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, या शेअर 120 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर जवळपास 88 टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीत LIC चीही गुंतवणूक - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनमध्ये मोटी गुंतवणूक केली आहे. LIC कडे कोठारी इंडस्ट्रियल कॉरपोरेशनचे 1471629 शेअर्स अर्थात 1.89 टक्के हिस्सेदारी आहे. शेअरहोल्डिंगचा हा डेटा डिसेंबर 2024 तिमाहीपर्यंतचा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)