1 / 6Success Story : जॉय अलुक्कास हे देशातील प्रसिद्ध उद्योगजक आहेत. ते Joyalukkas समूहाचे सीएमडी आहेत. देश-विदेशात सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रीत या समूहानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.2 / 6फोर्ब्सच्या टॉप १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत जॉय अलुक्कास ५० व्या स्थानावर आहेत. यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलरही बनलेत. त्यांची अंदाजे संपत्ती ४.४ अब्ज डॉलर आहे. यापूर्वी ते या यादीत ६९ व्या स्थानावर होते. अशा प्रकारे त्यांनी या यादीत ५० व्या स्थानावर पोहोचत १९ स्थानांची झेप घेतली आहे.3 / 6अलुक्कास मल्टी-नॅशनल ज्वेलरी रिटेल चेन Joyalukkas ग्रुपचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील वर्गीस अलुक्कास यांनी १९५६ मध्ये केरळमधील त्रिशूर येथील एका छोट्याशा दुकानातून अलुक्कास ज्वेलर्सची सुरुवात केली. 4 / 6१९८२ मध्ये वडिलांच्या व्यवसायात सामील झाल्यानंतर जॉय अलुक्कास यांनी त्याचं विशाल साम्राज्यात रूपांतर केलं. २००७ मध्ये त्यांनी जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं शोरूम आणि 'डायमंड केव्ह'ची स्थापना केली.5 / 6जॉय हे स्कूल ड्रॉपआऊट आहेत. अबुधाबीमध्ये कुटुंबाचं पहिलं इंटरनॅशनल स्टोअर सुरू करण्यासाठी ते १९८७ मध्ये मिडलइस्टमध्ये गेले होते. नंतर ते कुटुंबापासून विभक्त झाले आणि त्यांनी Joyalukkas नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. यात नऊ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. देशभरात १०० आणि परदेशात ६० ठिकाणी त्याची स्टोअर्स आहेत. चेन्नईत त्यांचे जगातील सर्वात मोठे सोन्याच्या दागिन्यांचे रिटेल स्टोअरदेखील आहे.6 / 6आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये Joyalukkas ची उलाढाल १४,५१३ कोटी रुपये होती. त्याचा निव्वळ नफा ८९९ कोटी रुपये होता. आता देशातील शोरूमची संख्या १३० पर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे. याशिवाय त्यांना उत्तर भारतात आपली उपस्थिती वाढवायची आहे. दरम्यान, अलुक्कास यांची पत्नी जॉली जॉय या Joyalukkas फाऊंडेशनच्या एमडी आहेत. त्यांचा मुलगा जॉन पॉल ग्लोबल ज्वेलरी फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.