शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा! गरज पडल्यास शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकता!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:28 PM

1 / 11
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे. या सुविधेद्वारे ग्राहक आपल्या बँक खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढू शकतात.
2 / 11
कधीकधी अचानक पैशांची गरज भासते आणि अशावेळी पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद असले तर मोठे आर्थिक संकट ओढावते. पण या परिस्थितीवर बँक ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या मदतीला येते.
3 / 11
बँकेच्या या सुविधेला ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखले जाते. एसबीआय ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता.
4 / 11
ओव्हरड्राफ्ट एकप्रकारे कर्ज (लोन) असते. यामुळे ग्राहक सध्या शिल्लक रकमेपेक्षा त्यांच्या बँक खात्यातून अधिक पैसे काढू शकतात. या अतिरिक्त पैशाची ठराविक मुदतीत परतफेड करावी लागते आणि त्यावर व्याजही आकारले जाते. व्याज दररोज मोजले जाते.
5 / 11
ओव्हरड्राफ्टची सुविधा कोणत्याही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) द्वारे दिली जाऊ शकते. ग्राहकांना मिळणार्‍या ओव्हरड्राफ्टची मर्यादा किती असेल, हे बँक किंवा एनबीएफसी ठरवते.
6 / 11
बँका त्यांच्या काही ग्राहकांना प्रिअप्रूव्ह्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. तसेच, काही ग्राहकांना यासाठी स्वतंत्र मंजुरीही घ्यावी लागेल. यासाठी लेखी किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करावा लागतो. काही बँका या सुविधेसाठी प्रक्रिया शुल्क आकारतात.
7 / 11
अनेक बँका चालू खातं, पगार खातं आणि मुदत ठेव (एफडी) वर ही सुविधा देतात. काही बँका समभाग, बाँड आणि विमा पॉलिसी सारख्या मालमत्तांच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही बँकेकडून तुम्हाला आवश्यक ते पैसे घेऊ शकता आणि नंतर ती रक्कम कर्जाच्या स्वरुपात परत करू शकता.
8 / 11
SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पगाराच्या खात्यात नियमित पगार जमा होत असेल तर ग्राहक ओव्हरड्राफ्ट सुविधा वापरू शकतो. ओव्हरड्राफ्ट सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल.
9 / 11
बँकेच्या अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली जाते. जर बँकेत एफडी नसेल तर त्यासाठी आधी तुम्हाला बँकेत असलेल्या कोणत्याही मालमत्तेची तारण ठेवावी लागेल. यानंतर, अटी पूर्ण करताच बँका तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते.
10 / 11
घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कालावधी दिला जाईल. वेळेत कर्ज नाही परत केले तर त्यासाठी दंडही आकारला जाईल. EMI देण्याच्याही काही मर्यादा नाही आहेत. तुम्ही कधीही संपूर्ण रक्कम बँकेला परत करू शकता. जॉईंट अकाऊंट असणारेही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
11 / 11
ओव्हरड्राफ्ट अंतर्गत तुम्ही किती पैसे घेऊ शकता याबाबत बँक निर्णय घेईल. हे तुमच्या उत्त्पन्नावरही अवलंबून आहे. वेतन आणि एफडीच्या बाबतीत बँकेच्या मर्यादा अधिक आहेत. सध्या अनेक बँका त्यांच्या चांगल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा आधीच देते. त्यामुळे कर्ज घेणे सोपे जाते.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाbankबँकMONEYपैसा