केवळ १५७ रूपयांत SBI उचलणार कोरोनाच्या उपचारांचा खर्च; पाहा कोणती आहे ही पॉलिसी By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 1:26 PM
1 / 15 सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 2 / 15 पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याचं दिसून येत आहे. 3 / 15 दरम्यान, अनेकदा रुग्णालयात असताना कोरोनावरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असतो आणि ते रुग्णालयाचा खर्च भरताना अनेकांची दमछाक होते. 4 / 15 सध्या देशातील प्रमुख शहरांमध्येही स्थिती भयावह होत चालली आहे. तर दुसरीकडेही सरकारनं कंबर कसली असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. 5 / 15 जर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्या उपचारांवरील खर्चाबाबत जर तुम्ही चिंतीत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियानं एक पॉलिसी आणली आहे. 6 / 15 स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी कोरोना रक्षक नावाची नवी पॉलिसी बाजारात आणली आहे. 7 / 15 या अंतर्गत ग्राहकांना केवळ १५७ रूपयांत ५० हजार रूपयांपर्यंतचं कव्हर मिळतं. 8 / 15 स्टेट बँक ऑफ इंडियानं सादर केलेला हा एक इन्शुरन्स प्रोटेक्शन प्लॅन आहे. 9 / 15 या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० टक्के कव्हर देण्यात येतं. 10 / 15 ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचं वय किमान १८ वर्षे असणं आवश्यक आहे. 11 / 15 या पॉलिसीचा मिनिमम प्रिमिअम प्लॅन १५६.५० रूपये इतका आहे. तर कमाल प्रिमिअम प्लॅन २२३० रूपये आहे. 12 / 15 ही टर्म पॉलिसी १०५ दिवस, १९५ दिवस आणि २८५ दिवसांची आहे. 13 / 15 कोरोना रक्षक पॉलिसीवर ग्राहकांना किमान ५० हजार रूपये आणि कमाल २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत कव्हर मिळतं. 14 / 15 या अंतर्गत जर १०५ दिवसांचा प्लॅन घ्यायचा असेल तर १५७ रूपयांचा प्रिमिअम द्यावा लागेल. या अंतर्गत ५० हजार रूपयांपर्यंतचं कव्हर मिळतं. 15 / 15 तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रान्चमध्ये जाऊन किंवा संकेतस्थळावर जाऊन याबबातची माहिती घेऊ शकता. आणखी वाचा